साळाव येथील बिर्ला मंदिर श्रद्धा शिस्त आणि शांततेचे केंद्र बनत आहे
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 गुरुवार , ८ जानेवारी २६
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील साळाव गावात वसलेले साळाव बिर्ला मंदिर हे मंदिर सध्या भाविकांसह पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे

हे मंदिर साळाव परिसरातील टेकडीवर वसलेले असून दूरवरूनही पांढऱ्या रंगातील भव्य रचना सहज लक्ष वेधून घेते
बिर्ला समूहाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेतून उभे राहिलेले हे मंदिर विक्रम विनायक म्हणजेच श्री गणेशाला समर्पित आहे
संपूर्ण मंदिर संगमरवरी पांढऱ्या दगडात बांधलेले असून स्वच्छता शिस्त आणि शांत वातावरण ही या मंदिराची ओळख बनली आहे
मंदिरात मुख्य गाभाऱ्यात श्री गणेशाची मूर्ती असून बाजूला रिध्दी सिद्धी विराजमान आहेत
मंदिर परिसरात सूर्य नारायण माँ दुर्गा शिव पार्वती आणि राधा कृष्ण यांची मंदिरे असून भाविकांना विविध देवतांचे दर्शन एकाच ठिकाणी घेता येते
त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक देवतांचे दर्शन भाविकांना घेता येते
या मंदिराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आतल्या गाभाऱ्यात आणि पूजा स्थळी फोटो काढण्यास पूर्ण बंदी आहे
मंदिराची पवित्रता आणि भाविकांची श्रद्धा जपण्यासाठी हा नियम काटेकोरपणे पाळला जातो
त्यामुळे आतले दर्शन हा केवळ डोळ्यांनी आणि मनाने अनुभवण्याचा विषय ठरतो
याच कारणामुळे मंदिराच्या आतल्या भागाचे फोटो कुठेही उपलब्ध नाहीत
त्यामुळे मंदिराची बाह्य भव्य रचना टेकडीवरील स्थान आणि परिसराचे सौंदर्य दाखवणारे फोटोच दुर्मिळ आणि महत्त्वाचे ठरतात
अशा परिस्थितीत भाविकांकडे किंवा पत्रकारांकडे असलेले फोटो माहितीच्या दृष्टीने मोलाचे ठरतात
शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवसांत मंदिरात विशेष गर्दी पाहायला मिळते
नोकरी व्यवसाय करणारे भाविक शुक्रवारपासूनच दर्शनासाठी येऊ लागतात
शनिवार आणि रविवारी अलिबाग चौल रेवदंडा तसेच मुंबई नवी मुंबई परिसरातून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतात
गर्दी असूनही मंदिर परिसरात शिस्त आणि शांतता टिकवली जाते
मोबाईल फोन कॅमेरे आणि बॅग्ज मंदिराच्या आत नेण्यास परवानगी नाही
दर्शन वेळ सकाळी आणि संध्याकाळी ठराविक असते आणि प्रवेश मोफत आहे
मंदिर परिसरात सुंदर बागा हिरवळ आणि मोकळा परिसर असल्यामुळे दर्शनानंतर बसून शांतता अनुभवता येते
टेकडीवरून कोकणातील निसर्गाचे मनमोहक दृश्य दिसते
यामुळे हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ न राहता हळूहळू शांत पर्यटनाचे केंद्र बनत आहे
अलिबाग परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या प्रवासात साळाव बिर्ला मंदिर हा एक महत्त्वाचा थांबा ठरत आहे
श्रद्धा शिस्त स्वच्छता आणि शांततेचा संगम साधणारे हे मंदिर रायगड जिल्ह्याच्या धार्मिक नकाशावर आपले वेगळे स्थान निर्माण करत आहे
फोटो कमी पण श्रद्धा अमाप
हीच आज साळाव येथील बिर्ला मंदिराची खरी ओळख बनली आहे
![]()

