विश्वासाच्या जोरावर पुढे पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 मंगळवार , २३ डिसेंबर २०२५

अलिबागच्या राजकारणात अनेक चेहरे येतात-जातात, मात्र पदापेक्षा कामामुळे ओळख निर्माण करणारी माणसं फारच थोडी असतात आणि त्यातलं एक ठळक नाव म्हणजे समीर मधुकर ठाकूर. जनतेच्या स्पष्ट कौलाने, समोरच्याचे डिपॉझिट जप्त करत, समीर ठाकूर नगरसेवक झाले असून हा विजय केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून तो सातत्यपूर्ण समाजसेवेचा, साधेपणाचा आणि विश्वासार्ह नेतृत्वाचा विजय आहे. अलिबागचे लोकप्रिय माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांचे सुपुत्र असतानाही त्यांनी कधीही त्या ओळखीचा बडेजाव केला नाही; उलट त्या वारशाची जबाबदारी ओळखून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी स्वतःला झोकून दिले. आरोग्य विषयक मदत असो, शासकीय कार्यालयात अडकलेली कामे असोत किंवा प्रभागातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न असोत — समीर ठाकूर नेहमी उपलब्ध राहिले, म्हणूनच ते नेते म्हणून नव्हे तर ‘आपला प्रतिनिधी’ म्हणून लोकांच्या मनात घर करून गेले. काँग्रेस–शेकाप आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक ५ मधून त्यांनी निवडणूक लढवली आणि जनतेने मतपेटीतून स्पष्ट संदेश दिला की आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामालाच संधी मिळावी. त्यांच्या सोबत शेकापच्या निवेदिता राजेंद्र वाघमारे यांनीही सक्षम साथ दिली. स्व. मधुशेठ ठाकूर यांचा समाजसेवेचा वारसा, स्वभावातील साधेपणा आणि कामातील सातत्य याच भांडवलावर समीर मधुकर ठाकूर यांनी हा विश्वास संपादन केला असून हा विजय म्हणजे अलिबागच्या जनतेच्या शहाणपणाचा आणि प्रामाणिक राजकारणाचा विजय आहे
![]()

