खरी कमाईतून माणुसकीचा विजय! स्काउट–गाईड विद्यार्थ्यांनी उचलला टी.बी.ग्रस्त विद्यार्थ्याच्या मदतीचा झेंडा
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर — शनिवार —२० डिसेंबर २०२५
श्रमप्रतिष्ठेचा जागर, सेवाभावनेचा धडाका आणि माणुसकीचा जिवंत आदर्श..स्काउट व गाईडच्या खरी कमाई उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ पैसे उभे केले नाहीत, तर समाजाला एक ठोस संदेश दिला आहे “मेहनतीच्या घामातूनच खरी मदत उभी राहते ”टी.बी.सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या जिंदाल विद्या मंदिर येथील विद्यार्थी अब्दुल हादी मतीन इद्रूस याच्या उपचारासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः कष्ट करून निधी संकलन केले. कोणतीही भीक नाही, कोणताही दिखावा नाही प्रामाणिक श्रम आणि शुद्ध सेवाभाव!घरगुती कामे, समाजोपयोगी सेवा, छोटे-छोटे उपक्रम करत विद्यार्थ्यांनी खरी कमाई केली आणि ती थेट एका गरजूच्या जीवनरक्षणासाठी अर्पण केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी श्रमाची प्रतिष्ठा, स्वावलंबन, समाजभान आणि करुणा यांचे धडे प्रत्यक्ष कृतीतून दिले.

👉 ही फक्त निधी संकलनाची बातमी नाही ही आहे माणुसकीची गर्जना.,.
👉 ही फक्त शालेय कृती नाही हा आहे समाजाला दिलेला ठोस धडा…
स्काउट–गाईड चळवळीने पुन्हा एकदा सिद्ध केले
देश घडतो तो अशाच संवेदनशील हातांतून…
![]()

