छावा ब्रेकिंग — नागावमध्ये बिबट्या अद्याप बेपत्तानागाव LIVE — रात्रीच्या टीम रिंगणात, पण बिबट्या अद्याप सापडला नाही! थरार कायम
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर —बुधवार १० डिसेंबर २०२५
वनविभाग, पोलीस व रेस्क्यू टीमचे रात्रभर चाललेले प्रयत्न अपयशी अजूनही ठावठिकाणा लागत नाही
नागाव गावावर धास्तावलेला बिबट्या अद्यापही सापडलेला नाही. सलग २४ तासांपासून शोधमोहीम सुरू असूनही वनविभाग, पोलीस, ड्रोन टीम आणि ट्रँक्विलायझिंग स्क्वॅडच्या हातून तो हुलकावणी देत आहे. रात्री विशेष बंदोबस्त असूनही प्राण्याचा कुठलाही मागमूस लागत नाही.
अ नागाव गावातील बिबट्याचा दहशतीचा थरार रात्रभरही कायम असून, जंगलातून वस्तीमध्ये येणाऱ्या बिबट्याचा ठावठिकाणा अजूनही लागत नाही आहे. वनविभाग, पोलीस, ड्रोन टीम, ट्रँक्विलायझिंग युनिट अशा मिळून ७० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचे पथक रात्रंदिवस शोधमोहीम राबवत आहेत.
काल मंगळवारी सकाळी ११ वाजता बाळू सुतार यांच्या घराजवळ बिबट्या दिसला आणि प्रसाद सुतार, कुणाल साळुंखे, अमित वर्तक, अलिबागचे रहिवासी मंदार गडकरी आणि भाऊसाहेब झावरे या पाच जणांना इजा झाली. सर्वजण अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
बिबट्या कंबरेएवढा उंच आणि अतिशय आक्रमक होता… तो भीती न बाळगता गल्ली–बोळातून फिरत होता, असे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी सांगितले.
बिबट्या नागाव वाडीच्या आतल्या दाट भागात शिरल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली.
🔴 रात्रीची अडचण मोठी बिबट्या सतत जागा बदलतो.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की बिबट्या एका ठिकाणी स्थिर राहत नाही. तो जंगलातून वस्तीमध्ये आणि पुन्हा जंगलात जात असल्याने पकड मोहिम अत्यंत अवघड बनली आहे. रात्री अंधारात त्याचा माग काढणे अशक्यप्राय झाले आहे.
उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले:
७० हून अधिक कर्मचारी, ड्रोन टीम आणि ट्रँक्विलायझिंग स्क्वॅड मैदानात आहे. रात्री विशेष बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. हा बिबट्या चुकून गावात शिरल्याची शक्यता असून तो स्वतःहून परत जंगलात जायचीही शक्यता आहे.
![]()

