नागावमध्ये बिबट्याचा हाहाकार शाळा लॉक.. गावात भीतीची थरथर

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर —मंगळवार ०९ डिसेंबर २०२५

अलिबाग तालुक्यातील नागाव गावात सकाळी बिबट्याचे दर्शन होताच खळबळ उडाली असून रस्त्यांवर शेकडोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी जमली आहे त्याचदरम्यान बिबट्याने दोन नागरिकांवर हल्ला चढवला असून एकजण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि या प्रकारामुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे सुरक्षेच्या दृष्टीने नागावमधील शाळांचे दरवाजे तात्काळ बंद करून सर्व विद्यार्थ्यांना आतमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे आणि पालकांनी पॅनिक न होता शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे कारण मुलं पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच त्यांना सुखरूप घरी सोडण्यात येणार आहे दरम्यान वनविभाग पोलीस प्रशासन आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी धाव घेत असून बिबट्याचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी नागरिकांना व पर्यटकांना स्पष्ट इशारा दिला आहे की अनावश्यक घराबाहेर पडू नये कोणतीही अफवा पसरवू नये आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे कारण बिबट्या सध्या गावाच्या हद्दीत फिरत असल्याची माहिती मिळत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *