छावा विशेष—महापरिनिर्वाण दिन – ६ डिसेंबर—भारताच्या मनात जिवंत बाबासाहेब
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मधुकर मयेकर शनिवार ०६ डिसेंबर २०२५

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या प्रत्येक श्वासात आहेत, त्यांच्या विचारांशिवाय या देशाची ओळख अपूर्ण आहे, त्यांनी अन्यायाच्या अंधारातून समतेचा दीप पेटवला आणि शिक्षणाची तलवार हातात देऊन स्वाभिमानाचा मार्ग दाखवला, त्यांनी संविधान लिहिले आणि लाखोंच्या आयुष्यात आत्मविश्वास पेरला, ते म्हणाले माणुसकीचं राष्ट्र घडा आणि आजही त्यांचा आवाज प्रत्येक तरुणाच्या स्वप्नात जागा राहतो, त्यांनी कधी बदला घेतला नाही तर बदल घडवला, त्यांची चैत्यभूमी जशी अखंड श्रद्धेचा महासागर आहे तशीच त्यांची शिकवण भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात उजेड देत आहे, महापरिनिर्वाण हा अंत नाही तर विचारांची अमर सुरुवात आहे कारण ते देहाने दूर गेले तरी मनामध्ये स्थान करून गेले, संविधान दिलं आणि हक्कांची ताकद माणसाच्या हातात ठेवली, ही ताकद आजही कायम आहे आणि तिचा उजेड पुढे नेण्याची जबाबदारी आदरणीय श्री. प्रकाश आंबेडकर सांभाळत आहेत, ते बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत हृदयात घेऊन लोकांसाठी उभे राहतात, त्यांचा आवाज अभ्यासू आणि भूमिकेचा आत्मविश्वास देणारा असतो, ते राजकारणासाठी राजकारण करत नाहीत तर लोकहक्कांसाठी दिशा निर्माण करतात, जिथे कुणाला न्याय हवा तिथे त्यांची भूमिका दिसते, जिथे कुणाला शिक्षणाची संधी हवी तिथे त्यांचे विचार बळ देतात, जिथे समतेचे स्वप्न तुटते तिथे ते उभे राहून म्हणतात संविधान आमचा श्वास आहे, ते युवांना सांगतात अधिकार मागू नका, अधिकार मिळवण्यासाठी उभे राहा आणि म्हणूनच लोक त्यांना मनाने नेता मानतात, बाबासाहेबांनी पेटवलेली ज्योत आजही तेजाने प्रज्वलित आहे कारण तिला प्रकाशाचा हात मिळालाय, नवे भारताचे ध्येय हेच की माणूस प्रथम, स्वाभिमान सर्वोच्च, शिक्षण सार्वत्रिक आणि संविधान सर्वांवर, महापरिनिर्वाण दिवस आपल्याला आठवण करून देतो की हे कार्य थांबलेले नाही, आपण प्रत्येकाने पुढे जायचे आहे, बाबासाहेबांच्या विचारांची वाट जपायची आहे आणि आदरणीय आंबेडकर साहेबांसोबत चालत प्रत्येक नागरिकासाठी न्यायाची वाट उजळत ठेवायची आहे, कारण बाबासाहेब हे फक्त इतिहास नाहीत तर जिवंत वर्तमान आहेत आणि त्यांची परंपरा ही भविष्याचा आत्मविश्वास आहे, भारतात जेव्हा कोणाचा हक्क अबाधित राहतो तेव्हा ते बाबासाहेब जिंकतात आणि जेव्हा समाज मजबूत होतो तेव्हा आंबेडकर साहेबांची दिशा यशस्वी होते, म्हणूनच आपल्या प्रत्येक पावलात त्यांचा सन्मान असावा, प्रत्येक आवाजात त्यांचा संदेश असावा, आणि प्रत्येक कृतीत त्यांची स्वप्नं साकार होत राहावीत, हेच आपण करू शकलो तर भारत अधिक न्यायी, अधिक संवेदनशील आणि अधिक स्वाभिमानी होईल, आणि म्हणूनच आज आपण एकच म्हणू, बाबासाहेब आमच्या मनात आणि त्यांचा प्रकाश आमच्या वाटचालीत.
छावा विशेष संपादकीय — आदरणीय श्री. प्रकाश आंबेडकर : बाबासाहेबांच्या स्वप्नांचा उजेड

६ डिसेंबर… भारताच्या इतिहासातील असा दिवस, ज्या दिवशी शरीर मावळलं, पण विचारांचा सूर्य अधिक तेजाने उगवला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समानतेचा मार्ग दाखवला, मानवी हक्कांची कवचकुंडलं दिली, आणि संविधानाच्या रूपाने अखंड लोकशाहीचा आधारस्तंभ उभा केला. आज त्या दीपाच्या ज्योतीला जबाबदारीने, सन्मानाने, आणि अढळ भूमिकेत आदरणीय श्री. प्रकाश आंबेडकर वाहत आहेत. आदरणीय श्री. प्रकाश आंबेडकर फक्त नावाचा वारस नाहीत, तर विचारांचा जपणूकदार आहेत. त्यांच्या नेतृत्वात तर्क आहे, न्याय आहे, संविधानिक मूल्यांची दृढ बाजू आहे, आणि त्यांची एकच भाषा समतेचे राष्ट्र! ते प्रत्येक नागरिकासाठी उजेडाचा दिशादर्शक आहेत. शिक्षण हा हक्क आहे, स्वाभिमान हे अस्तित्व आहे, माणुसकी हीच खरी ओळख आहे, संविधान हेच सर्वोच्च आहे हा संदेश ते सातत्याने जनतेला देतात. म्हणूनच युवांच्या मनात त्यांच्याविषयी आदर आणि विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे, कारण नेतृत्व तेच जे प्रत्येकासाठी उभं राहातं. देशाच्या लोकशाहीत जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्यांचा आवाज सर्वप्रथम ऐकू येतो. आंबेडकर साहेबांची भूमिका कधीच डळमळीत नसते. कारण ते चालतात जनतेच्या आत्मविश्वासावर आणि मार्ग निवडतात संविधानाच्या प्रकाशात. आजची पिढी आदर्श शोधते, प्रामाणिक नेतृत्वाची गरज जाणते आणि त्यांना दिसतात आदरणीय श्री. प्रकाश आंबेडकर! एक अभ्यासू, दूरदृष्टीचा, सर्वांना सामावून घेणारा नेता. त्यांच्या प्रत्येक हाकेत एक संकल्प दडलेला असतो हक्कांसाठी उभे रहा! मानवी मूल्यांसाठी आवाज उठा! महापरिनिर्वाण दिन फक्त स्मरणाचा नाही, तो कर्तव्याची जाणीव देणारा दिवस आहे. चला ठरवूया शिक्षण हेच सामर्थ्य, स्वाभिमान हा श्वास, संविधान हा धर्म, समानता हा मार्ग. हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली! बाबासाहेबांचे विचार आजही जीवंत आहेत — प्रत्येक शाळेतल्या अक्षरात, प्रत्येक न्यायालयातील निर्णयात, प्रत्येक हक्कासाठी उभ्या असलेल्या नागरिकात. आणि त्या उजेडाला दिशा देत उभे आहेत आदरणीय श्री. प्रकाश आंबेडकर.
जय भीम. जय संविधान. छावा जनतेचा आवाज.
✍️ संपादकीय : सचिन मधुकर मयेकर
![]()

