रविवार विशेष राज्यात पूर्ण बंदी असतानाही सुगंधित तंबाखूचे पॅकेट्स युवकांच्या हातात; रेवदंड्यात शासकीय कार्यालयात CCTV फुटेजमध्ये विमल वापरताना काही व्यक्ती दिसल्याची चर्चा – मग हा माल येतो कुठून?
रेवदंडा आणि अलिबाग तालुक्यात काही युवकांच्या हातात ‘विमल’ची पॅकेट्स दिसतात,विक्रीचा पुरावा नसला तरी या दृश्यांमुळे राज्यातील बंदी कितपत पाळली जाते आणि पुरवठा कुठून सक्रिय आहे. हा मोठा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.सुगंधित तंबाखू हा फक्त “मजा” नसून आरोग्य, समाज आणि तरुण पिढीचा थेट विनाश आहे.
राज्यात गुटखा–सुगंधित तंबाखूवर कडक बंदी असतानाही, रेवदंड्यातील एका शासकीय कार्यालयात CCTV फुटेजमध्ये काही व्यक्ती विमलची पॅकेट फोडून खाताना दिसल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली आहे.विक्री कुठे होते याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसला तरीअशा पदार्थांची पॅकेट्स सरकारी कार्यालयातही दिसणे हा अत्यंत चिंताजनक प्रकार मानला जात आहे.यामुळे स्थानिकांमध्ये एकच प्रश्न निर्माण झाला आहे मग हे विमलचे पॅकेट्स गावात येतात कुठून? आणि युवकांच्या हातात इतक्या सहज कसे पोहोचतात.हा प्रश्न आता अधिक गंभीरपणे उपस्थित होत असून,बंदी असूनही सुगंधित तंबाखूचा पुरवठा कोणाकडून आणि कसा होतो,याची तपासणी आवश्यक असल्याची चर्चा गावात वाढत आहे.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर—रविवार – 30 नोव्हेंबर २०२५
राज्यात बंदी असतानाही ‘विमल’ची पॅकेट्स युवकांच्या हातात दिसत असल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह; सुगंधित तंबाखू किती घातक, कुठे तयार होतं आणि महाराष्ट्रात कसं घुसतं?महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूवर कडक बंदी असूनही,रेवदंडा नव्हे तर अलिबाग तालुक्यासह अनेक भागांत काही युवकांच्या हातात ‘विमल’ची पॅकेट्स दिसतात, अशी माहिती नागरिकांकडून मिळत आहे.विक्रीबाबत कोणताही ठोस पुरावा नसला तरी युवकांच्या हातात पॅकेट्स सर्रास दिसत असल्याने,“मग हा माल राज्यात घुसतो कसा?” असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.ही बाब जितकी गंभीर, तितकीच धोकादायक आहे. कारण विमलसारखी सुगंधित तंबाखूची उत्पादने आरोग्यास अत्यंत घातक आहेत आणि कायद्यानं बंद असतानाही लोकांच्या हातात ती कशी दिसते, हे स्वतःतच संशय निर्माण करतं.
विमल इतका घातक का? त्यात नक्की काय असतं?
सुगंधित तंबाखू/गुटखा म्हणजे केवळ “पान मसाला” नसतो. त्यात अत्यंत विषारी पदार्थ मिसळलेले असतात:विमलसारख्या उत्पादनांमध्ये सामान्यतः आढळणारे घटक
तंबाखू (निकोटीनचे जबरदस्त प्रमाण)
सुपारी (carcinogenic — कर्करोग निर्माण करणारी)
चुना (कॅल्शियम हायड्रॉक्साइड — तोंडाच्या पेशी जाळणारा)
सुगंधी रसायने
फ्लेवर्स व परफ्यूम केमिकल्स
रंगद्रव्ये
गोडवा देणाऱ्या रसायनांचा वापर
ह्यूमेक्टंट — जो व्यसन अधिक वेगाने चढवतो
ही मिश्रणं तोंडाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, हृदयविकार, पचनाचे गंभीर आजार, दात-हाडांची हानी यासाठी थेट जबाबदार मानली जातात.विमलच्या १ पॅकेटमधील निकोटीन एक पॅकेटमधील निकोटीन सिगारेटपेक्षा जास्त व्यसनकारक असू शकतो.म्हणूनच तरुण पिढी एकदा चव घेतली की ३–४ महिन्यांत व्यसनात अडकते.
विमल कुठे तयार होतं?
विमल हा ब्रँड Vishnu & Company Trademarks Pvt. Ltd. (दिल्ली) यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
यांची उत्पादन/पॅकेटिंग युनिट्स महाराष्ट्रात नाहीत; राज्यात ते कायद्यानं पूर्णपणे बॅन आहेत.
उत्पादन बहुधा पुढील राज्यात:
दिल्ली, गुजरात, उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश याठिकाणी काही पॅकेटिंग युनिट्स अजूनही कार्यरत असल्याच्या नोंदी मिळतात मग बॅन असलेला माल महाराष्ट्रात येतो कसा?तपासात समोर आलेल्या पद्धती
१) ट्रान्सपोर्टमध्ये इतर मालामध्ये लपवून
किराणा माल, कपडे, इलेक्ट्रॉनिक्सच्या बॉक्समध्ये लहान पॅकेट्स
चेकपोस्टवर ओळखीने माल सोडणे
२) कुरिअर/पार्सलमध्ये लहान शिपमेंट्स
पाठवणाऱ्याचे नाव बदलणे
लोकेशन बदलून छोटे पॅकेट्स पाठवणे
३) हातावर पुरवठा करणाऱ्या छोट्या नेटवर्कद्वारे
4 ते 6 जणांचा छोटा गट
रात्री पॅकेट वाटप
“ओळख” असेल तरच देणे
४) जिल्ह्याच्या बाहेरून येणारे छोटे विक्रेते
सप्ताहातून एकदा माल देणे
सतत नंबर बदलणे
म्हणजेच बंदी असूनही वितरणाची ‘गुप्त चेन’ सक्रिय आहे.
तेव्हा युवकांच्या हातात पॅकेट्स दिसणं हे गंभीर संकेत आहेत.
पकडल्यास कोणती कलमे लागू?
FSSAI (कठोर शिक्षा), कलम 26(2)(i): बंदी असलेला पदार्थ विकणे, कलम 59: ६ महिने ते ७ वर्ष तुरुंग + मोठा दंड IPC (भारतीय दंड संहिता), 188: शासकीय आदेश मोडणे, 272: भेसळयुक्त/हानिकारक पदार्थ विकणे, 273: आरोग्यास अपायकारक पदार्थ विकणे ➡️ शिक्षा — ६ महिने ते ६ वर्ष तुरुंग
COTPA (तंबाखू कायदा) कलम 7, 8, 9, 10, 20 — पॅकेटिंग/विक्री नियमभंग सर्वात कडक — MCOCA (मोक्का)
जर पुरवठा करणारी टोळी, राज्यात माल आणणारी साखळी, मोठा समूह आढळला तर गुटखा नेटवर्कवर आता थेट MCOCA लागू होऊ शकतो.MCOCA शिक्षाः5 ते 10 वर्ष तुरुंग काही प्रकरणात आजन्म कारावास, मालमत्ता जप्त ही महाराष्ट्रातील सर्वात कठोर कारवाई आहे.
तरुण पिढीला सर्वात मोठा धोका
तोंडाचा कर्करोग, मेंदूवरील निकोटीनचा प्रचंड परिणाम, एकाग्रता नष्ट, अभ्यास बिघडतो, मानसिक अस्थिरता, घरची परिस्थिती ढासळते, व्यसन ३–४ महिन्यात पकडतं.एका छोट्या पॅकेटमध्ये आयुष्य पूर्णपणे नष्ट करण्याची ताकद आहे.
![]()

