दत्तयात्रा उंबरठ्यावर… आणि गाभाऱ्यात बूट घालून शिरलेले ‘निर्लज्ज चोरटे’ अजूनही मोकाट
छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर—शनिवार – २९ नोव्हेंबर २०२५
काही दिवसांतच चौल-भोवाळ्याची दत्तयात्रा सुरू होते… लाखो भाविक येणार आहेत.पण भक्तांच्या मनात आजही एकच संताप उसळतो गाभाऱ्यात चक्क पायात बूट घालून शिरणारे निर्लज्ज, बेदम, धाडसी चोरटे आजही मोकाट फिरत आहेत.दत्ताच्या पवित्र जागेत असा अवमान करून चोरी करणाऱ्यांना अजूनही ना ओळख, ना कारवाई, ना पकड.सीसीटीव्हीत त्यांची सावली, चाल, येणं-जाणं सगळं कैद आहे…पण तपास मात्र जागेवरच.भक्तांचा थरकाप गाभाऱ्यात अपवित्र पावलांनी घुसलेले ते कोण? आणि आजही मोकळेच कसे.
दत्तयात्रा येतेय…

पण सुरक्षा, तपास, आणि जबाबदारी कुठे थांबलीय याचा हिशोब मागण्याची वेळ आता आली आहे.
चौल-भोवाळे दत्तमंदिरातील ४० किलो चांदीची सिने-स्टाईल चोरी.
जत्रा संपली… चोर दिसले… तरीही तपास गायब.
सुमारे १६० वर्षांचा इतिहास, लाखो भाविकांची नितांत श्रद्धा सुमारे ७०० पायऱ्यांवरील दिव्य दत्तस्थान… आणि याच चौल-भोवाळे दत्तमंदिरातून ४० किलो चांदी गायब..होय, चुकीचं वाचलं नाही संपूर्ण ४० किलो चांदी..
जत्रा ११ डिसेंबरला संपली… आणि काही दिवसांतच धडाकेबाज चोरी.रायगड, मुंबई, पुणे, ठाणे — या सर्व भागांतून लाखो भाविक येतात.पाच दिवसांची जत्रा पार पडली… भक्तांचा ओघ संपला… आणि त्यानंतर मंदिर समितीच्या पाहणीत गाभाऱ्यातील चांदी गायब.परिसर एकदम थरथरला — चौल हादरलं, भक्त पेटले.
सिने-स्टाईल चोरी…
कॅमेऱ्यात चोर स्पष्ट दिसले… हालचाल, शिरकाव, फिरून जाणं सगळं कैद.
होय सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे अगदी चित्रपटातील सस्पेन्स सीनसारखे दिसले.कॅमेऱ्यांत त्यांची फिरणारी पावले, त्यांच्या हातवाऱ्या, परिसरातली नजर — EVERYTHING CLEAR!
👉 पण निकाल? शून्य. ZERO. काहीच नाही!
चोर दिसले… पण पकडले गेले नाहीत.
हे भक्तांना पचत नाही… आणि आता प्रशासनालाही या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागेल.
पोलिस पथक नेमलं… गुन्हे अन्वेषण विभागही उतरला… पण तपास कुठे?रायगड जिल्हा पोलिस + स्थानिक गुन्हेअन्वेषण पथकसर्व जण कामाला लागले असल्याचे जाहीर झाले.
पण तीन वर्षांनंतरही—
❌ चांदी कुठे गेली?
❌ चोर कोण होते?
❌ फूटेजवरून ओळख का नाही?
❌ स्क्रॅप मार्केट तपास काय झाला?
काहीच उत्तर नाही.
दत्तभक्तांचा संताप — चोर दिसतायत… पण चोर अजून मोकाट.
भक्त म्हणतात—
मंदिरातली ४० किलो चांदी चोरीला जाऊन तीन वर्षे झाली…
सीसीटीव्हीत चोर दिसूनही तपास अडकला.
हा तपास आहे की थट्टा?
यात्रा पुन्हा सुरू होणार… आणि भक्त आता प्रशासनाकडून कडक उत्तरांची मागणी करत आहेत.
![]()

