एक दिवस आमचाही बहरण्याचा लाईट ऑफ लाइफ ट्रस्टचा पालक मेळावा उत्साहात पार

लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट ही शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था गेली १९ वर्षे डॉ. विली डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग व मुरुड तालुक्यात कार्यरत आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवताना, पालकांनाही समान महत्त्व देत दरवर्षीप्रमाणे यंदाही “एक दिवस आमचाही बहरण्याचा” या भावनेतून भव्य पालक मेळावा आयोजित करण्यात आला.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर— बुधवार – २६ नोव्हेंबर २०२५

हा मेळावा लाईट ऑफ लाइफ ट्रस्टच्या आनंदो प्रकल्पांतर्गत दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दादा गार्डन हॉल, गरूडपाडा–बामणगाव येथे पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यासाठी मान्यवर म्हणून उपस्थित होते:श्री. प्रमोद काशिनाथ भोपी, श्री. अतुल हेमंत गुरव, श्री. सुरेश जानू पाटील प्रकल्प समन्वयक, आर्या राऊत, आनंदो ऑफिसर अनुजा राऊळ, अनंत प्रकल्पाचे सिनियर ऑफिसर जगदीश पाटील, बोर्ली, वळके, रामराज व बेलोशी परिसरातून तब्बल २७८ पालक मेळाव्यात सहभागी झाले.

पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले:

टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, समूह गीतगायन, सामूहिक नृत्य, आकर्षक फनी गेम्स स्पर्धांचे परीक्षण सामाजिक जाणीव असलेल्या प्रमोद भोपी, अतुल गुरव आणि सुरेश पाटील या मान्यवरांनी केले. विजेत्या पालकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार लाईट ऑफ लाइफ ट्रस्टमधून घडलेले असे अनेक विद्यार्थी आज स्वतःच्या पायावर उभे राहत कुटुंबाचा आधार बनले आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांचा विशेष सत्कार करुन त्यांना प्रेरक आदर्श म्हणून सन्मानित करण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी व आकर्षक पद्धतीने पार पडण्यासाठी पुढील टीमचे विशेष योगदान लाभले. प्रकल्प समन्वयक आर्या राऊत, आनंदो ऑफिसर अनुजा राऊळ, सेंटर एक्झिक्युटिव्ह रश्मी अष्टमकर, राणी जाधव, अपेक्षा शेळ्के, सोनल घरत

तसेच सर्व शिक्षकवृंद

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *