रविवार विशेष 🔥 रायगडचा दरबार: कागद फाडला तरी घुमणारा आवाज..  हिरोजी इंदुलकरांची अप्रतिम शास्त्रीय युक्ती अखेर उलगडली…

छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर— रविवार – २३ नोव्हेंबर २०२५

रायगड.. शिवछत्रपतींचा राजदरबार..

जिथे एकेक शब्द आदेश नव्हता—तर महाराजांची सिंव्हगर्जना असायची.आजही इतिहास सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राजसिंहासनावर बसत,तेव्हा त्यांचा आवाज संपूर्ण दरबारभर एकसारखा पोहोचत असे.इतका परफेक्ट की मावळ्यांमधील अगदी हळुवार कुजबुज सुद्धादूरच्या शेवटच्या दगडापर्यंत घुमत असे.लोककथा नाही. चमत्कार नाही.ही होती हिरोजी इंदुलकर या महाराजांच्या अद्वितीय वास्तुविशारदाची अचूक वैज्ञानिक खेळी..ध्वनी शास्त्राची पराकाष्ठा – हिरोजी इंदुलकरांचा ‘राजदरबार मॉडेल’शत्रूला गडाचा कल कळला तरी आवाजाची युक्ती कळू नये म्हणूनहे संपूर्ण ध्वनीतंत्र कंपनीनेही कुठे प्रसिद्ध केलेलं नाही.पण रायगडच्या दगडांत आजही त्याची साक्ष जिवंत आहे.

👉🏻 खोबणीदार (Concave) दरबार – नैसर्गिक ऍम्प्लीफायर

👉🏻 दरबाराची जमिनीची रचना वाकलेली, थोडी आतल्या बाजूला खेचलेली.या “बाऊल शेप”मुळे बोलण्याचा साधा आवाजहीथेट श्रोत्यांकडे फोकस होतो.

👉🏻 आवाज नाचत नाचत पुढे पोहोचतो… घुमत पोहोचतो..

👉🏻 लॅटराइट दगड – आवाज परत फेकणारा जादुई दगड

रायगडावर वापरलेला लॅटराइट दगड आवाज शोषत नाही.उलट, तो आवाज परत फेकतो… दुप्पट ताकदीने..म्हणून कागद फाडला, टाळी वाजवली किंवा एक शब्द उच्चारला त्याला मिळतं प्रचंड ‘इको बूस्ट’.

👉🏻 भिंतींचा कोन – महाराजांनी दिलेला आवाज..

राजसिंहासन बसवले आहे अगदी भिंतींच्या एका खास कोनात.या कोनातून निघालेला आवाजडाव्या-उजव्या दोन्ही भिंतींवर अपटत संपूर्ण दरबारात समप्रमाणात पसरतो.कोणताही माणूस कुठेही उभा राहिला तरी त्याला राजांचा आवाज समान ताकदीने ऐकू येत असे.

👉🏻 नागारखाना – प्रतिध्वनीची अंतिम खेळी

दरबाराच्या पुढच्या भागाला नागारखाना. नागारे होण्यासाठीच बांधलेली रचना.यामुळे प्रत्येक आवाजाला ‘तिसरा धक्का’ मिळत असे.

→ आवाज दरबारभर जाऊन परत येतो…

→ आणि मग दणाणून घुमतो..

⚔️ हिरोजी इंदुलकर – जादूगार नव्हे, शास्त्रज्ञ..

खूपजण इंदुलकरांविषयी “गूढ युक्ती” बोलतात. पण खरी युक्ती म्हणजे वास्तुशास्त्र + ध्वनिशास्त्र + बुद्धिमत्ता + गडांच्या रचनांची खोल जाण यांचा सांगोपांग मिलाफ.. त्यांनी राजांना असा दरबार दिला की त्या सिंहासनावरून निघणारा आवाज होताशासन, शिस्त आणि स्वराज्याचा अटल आदेश. आजही रायगड सांगतो छत्रपतींचा आवाज कधीच मावळत नाही…आज तुम्ही रायगडावर उभे रहा…आणि दरबारात छोटासा आवाज करा…आपल्या तो तिथे सर्वत्र स्पष्ठ ऐकू येईल..जिथे इतिहास बोलतो,आणि दगडांवरूनही आवाज परत येतो तो रायगड फक्त किल्ला नाही…तो हिरोजी इंदुलकरांची जगात कुठेही न मिळणारी वैज्ञानिक किमया आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *