रेवदंड्याचा सामाजिक उपक्रम टाटा हॉस्पिटलमध्ये आशिष गोंधळी यांची मानवतेची सेवा

मुंबई परळ येथील टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या आजारी रुग्णांच्या नातेवाईकांना वर्षातून एक-दोन वेळा दुपारच्या जेवणाची सोय करून देण्याचा सामाजिक उपक्रम रेवदंड्यातील आशिष अनंत गोंधळी गेली अनेक वर्षे आवर्जून राबवत आहेत. रुग्णांच्या कुटुंबांवरचा ताण कमी करण्यासाठी ते स्वतःहून मदतीचा हात पुढे करतात.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर,बुधवार – १९ नोव्हेंबर २०२५

या उपक्रमामुळे अनेकांना उपचाराच्या काळात दिलासा मिळत असून, मानवी मूल्यांवर आधारित अशा कार्याचे स्थानिक समाजात कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नी प्रीती आशिष गोंधळी या रेवदंडा ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेंत.

मानवतेचा हा साधा पण हृदयाला भिडणारा उपक्रम रेवदंड्याच्या सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर परिचय देत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *