रोड टॅक्स भरतो, PUC काढतो… मग रस्ता कोण देणार? अलिबागच्या रस्त्यावर धुळीचं वादळ, खड्ड्यांचं साम्राज्य.
रस्त्याला वाली कोण आहे?
छावा डिजिटल न्यूज पोर्टल –अलिबाग –सचिन मयेकर सोमवार – १७ नोव्हेंबर २०२५
अलिबाग – बेलकडे ते अलिबाग हा रस्ता म्हणजे आता अक्षरशः रस्ता की रणांगण.
या मार्गावर इतके खोल खड्डेच खड्डे आहेत की वाहनं डावीकडून–उजवीकडे झोके घेत जातात, जणू काही रस्त्यावर नव्हे तर आट्या-पाट्यांच्या मैदानावर प्रवास सुरु आहे.
रस्त्याचं डांबर उखडून गेलेलं, खोल खड्डे आणि त्यातून उठणारे प्रचंड धुळीचे लोळ यामुळे हा रस्ता प्रवाशांसाठी रोजची यातना बनला आहे.
दिवसाढवळ्या उठणाऱ्या धुळीच्या ढगांमुळे वाहनचालकांना दोन फूट पुढे दिसत नाही. या धुळीमुळे दमा असलेल्या रुग्णांचा त्रास वाढला,श्वसनाचे आजार बळावले,सर्दी खोकल्याचे प्रमाण तुफान वाढले,लहान मुलं व ज्येष्ठ नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत.गेल्या काही दिवसांत अनेक दुचाकीस्वार घसरले, तर एक तरुणी अपघातातून थोडक्यात बचावली. वाहनं धक्के खात उंच उडून परत चारपट जोराने खाली आपटतात जणू रस्ता नव्हे तर जीवघेणा ट्रॅप पर्यटक आणि ग्रामस्थ यांची तक्रार थेट व जळजळीत आम्ही रोड टॅक्स भरतो, PUC काढतो, नियम पाळतो…मग प्रशासन रस्त्याची जबाबदारी का पाळत नाही.रस्त्याच्या नावाखाली खड्ड्यांचं साम्राज्य आणि त्यात उठणाऱ्या धुळीचं वादळ पाहून लोकप्रतिनिधींवरही प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आहे.
ग्रामस्थांचा थेट सवाल
कोणी रस्ता देतो का रस्ता..
उखडलेला रस्ता आता प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आरसाच बनला आहे.
जनतेच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला आहे आणि तात्काळ दुरुस्ती न झाल्यास मोठी दुर्घटना होणार हे निश्चित आहे.
![]()

