किती काळ लपवाल हा शालेय जुलूम? शिक्षेच्या नावाखाली मुलांना छळणाऱ्या ‘अघोरी शिक्षिका’चा मुखवटा फाडला एक अंशिका मेली, पण हजारो विद्यार्थी अजूनही गप्पच सहन करत आहेत

वसईतील श्री हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये 13 वर्षीय अंशिका गौडचा मृत्यू झाला आणि शिक्षण व्यवस्थेच्या काळ्या अध्यायावरच प्रकाश पडला.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल —PTI – शनिवार – १५ नोव्हेंबर २०२५

शिक्षकांच्या हातात दिलेल्या ‘शिक्षेच्या अधिकाराचा’ गैरवापर कसा मृत्यूच्या दारात ढकलतो, याचं रक्त गोठवणारं उदाहरण अंशिकेच्या मृत्यूमुळे देशासमोर आलं आहे.शाळेत पोहोचायला दहा मिनिटं उशीर झाला म्हणून सहावीत शिकणाऱ्या अंशिकेला 100 उठाबशांची शिक्षा देण्यात आली.शिक्षिकेचा राग इतका अघोरी होता की शिक्षेचे स्वरूप ‘शिस्त’ नव्हे तर सरळ छळ होता. इतर विद्यार्थी थांबले, पण घाबरलेली अंशिका शिक्षिकेच्या भीतीने 100 उठाबशा काढत राहिली… आणि तिची तब्येत बिघडत गेली.

रुग्णालयात हलवूनही प्राण वाचला नाही.

बालदिनाच्या दिवशीच तिचं बालपण संपलं, जीवनही संपलं.आणि खरी भीती इथेच आहे शा शिक्षा अनेक शाळांमध्ये आजही सुरू आहेत.फक्त बातमी होत नाही.फक्त अंशिका सारखं दुर्दैव घडलं तरच लोकांच्या नजरेत येतं.नाहीतर मुलं शांत… पालक अनभिज्ञ… आणि शिक्षकांचा जुलूम सुरूच!ही  शाळा तर नोंदणी नसलेली—मान्यताच नाहीअधिकृत कागदपत्रे नसलेल्या शाळेत मुलांवर अत्याचार चालू होते.पालकांच्या विश्वासाला तडा देऊन, ‘शिक्षण’ देण्याच्या नावाखाली मुलांना मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचं धाडस शिक्षिकेनं केलं.

घटनेनंतर मनसेने शाळेवर टाळं ठोकलं.

दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत शाळा सुरू करू देणार नाही, अशी कडक भूमिका घेतली आहे.पालकांकडूनही संतापाचा उद्रेक होत आहे.

Today, a burning question stands before Maharashtra

का अजूनही काही शिक्षकांना शिक्षा म्हणजे छळ वाटतोय?का विद्यार्थ्यांच्या भीतीवर शिक्षणाचं साम्राज्य उभारलं जातंय?आणि का प्रत्येक अंशिकेला तिच्या वेदना सांगायला आवाज मिळत नाही?अंशिका गेली – पण तिच्या मृत्यूने हजारो विद्यार्थ्यांच्या छळकथांचा दरवाजा उघडला आहे.आता हा जुलूम थांबवण्याची वेळ आली आहे.नाहीतर उद्या आणखी एक अंशिका बातमीत येईल…आणि शाळा परत निष्काळजीपणे सांगतील  शिस्तीसाठी दिलेली शिक्षा होती.

 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *