दोन दिवसांच्या शोधानंतर हरवलेली चिमुकली सापडली

पेण तालुक्यातील डोंगराळ व दाट जंगल परिसरात दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली चिमुकली काल सकाळी नेमक्या 10 वाजता सुखरूप अवस्थेत सापडली. या दिलासादायक घटनेमुळे संपूर्ण गावात समाधानाची भावना पसरली आहे.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल —सचिन मयेकर —पेण शनिवार – १५ नोव्हेंबर २०२५

चिमुकली हरवल्यानंतर पोलिसांनी, स्थानिक ग्रामस्थांनी  मिळून सलग दोन दिवस मोठी शोधमोहीम राबवली. गावातील नागरिकांनी रात्रीपर्यंत शोध सुरू ठेवला होता. तीन स्वतंत्र शोध टीम तयार केल्या होत्या.

काल सकाळी शोधपथक एक दाट झुडपाच्या भागात पोहोचले असता रडण्याचा क्षीण आवाज ऐकू आला. त्या दिशेने तत्काळ धाव घेतल्यावर ती चिमुकली झाडाझुडपात बसलेल्या अवस्थेत आढळून आली.

ग्रामस्थांनी सांगितले की,

दोन दिवस पूर्ण गाव जंगलात शोध घेत होता. तरीही काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. शेवटी काल सकाळी 10 वाजता तिचा आवाज आल्यानेच ती सापडली.

चिमुकली दोन रात्री जंगलातच असल्याचे सांगितले जात असून तिला तातडीने आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

ग्रामस्थांचे सहकार्य, पोलिसांचे प्रयत्न आणि स्थानिक टीमची सतत धडपड यामुळे ही मोठी मोहीम यशस्वी झाली.

गावात सध्या सुटकेचा नि आनंदाचा माहोल आहे

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *