पेण हादरला! ‘आई, आलोच मी’ म्हणणारी चिमुकली गायब – SP आंचल दलाल यांच्या आदेशानं संपूर्ण पोलिस यंत्रणा हलली

पेण तालुक्यातील हेटवणे वाडी या छोट्याशा गावावर काळोख दाटला आहे. फक्त चार वर्षांची किशोरी किरण महालकर बुधवारी सकाळी आपल्या आईसोबत गावाबाहेर गेली आणि काही क्षणांतच बेपत्ता झाली.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल —सचिन मयेकर — पेण — गुरुवार – १३ नोव्हेंबर २०२५

आईने “बाळा, आलोच मी” एवढं म्हणत वळली… पण मागे पाहिलं तेव्हा चिमुकली गायब!

आईच्या किंकाळ्यांनी गाव दणाणलं, गावकरी शेत-नाले-झाडाझुडपात शोध घेऊ लागले. रात्री उशिरापर्यंत टॉर्चच्या उजेडात मोहीम सुरू राहिली.

दरम्यान, गावकऱ्यांना मुलीची चप्पल आणि कपडे नाल्याजवळ सापडले, पण मुलगी मात्र कुठेच सापडली नाही.

या घटनेनं संपूर्ण परिसर हादरला असून गावात भीती आणि संशयाचं सावट पसरलं आहे.

“घातपात की काही दुसरं?” या प्रश्नावर सगळ्यांचं लक्ष केंद्रीत झालं आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ आदेश जारी केले!

त्यांच्या सूचनेनुसार

👉 पेण पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखाली

👉 सीआरपी, क्यूआरटी, श्वानपथक, तसेच खोपोली बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

स्वतः SP दलाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून “शोधमोहीम अखंड सुरू ठेवावी, कुठलीही शक्यता नाकारू नये” असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

दुर्गम भागात ड्रोनसह शोध सुरू असून, तलाव-नाले परिसर सील करण्यात आले आहेत.

२६ तास उलटून गेले, पण अजूनही चिमुकलीचा काहीच पत्ता नाही.

गावात शांतता नाही, फक्त एकच आवाज

किशोरीला शोधा…

 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *