विमानतळावर सीमाशुल्कचा मेगा स्फोट १४ कोटींचे अमली पदार्थ आणि सोने जप्त – एकामागोमाग एक धडक कारवाईने विमानतळ हादरले
:छावा डिजिटल न्यूज पोर्टल — PTI—मुंबई — बुधवार – १२ नोव्हेंबर २०२५
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने ६ ते ९ नोव्हेंबर या चार दिवसांत सलग मोठ्या प्रमाणावर कारवाई करून तब्बल १४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ आणि सोने जप्त केले आहे.
या दरम्यान बँकॉक, फुकेत आणि नैरोबी या ठिकाणांहून आलेल्या अनेक विमानांतील प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात गांजा आणि सोने ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे विमानतळावरून अमली पदार्थांच्या तस्करीचे एक मोठे जाळे उघडकीस आले असल्याची माहिती मिळाली आहे.
६ नोव्हेंबर
बँकॉकहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाकडून सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी २.८७ किलो उच्च प्रतीचा गांजा जप्त केला. या मालाची किंमत तब्बल ₹२.८७ कोटी एवढी आहे. या प्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली.
७ नोव्हेंबर
फुकेतहून आलेल्या विमानातील दोन प्रवाशांकडून ४.०२२ किलो गांजा जप्त करण्यात आला. या दोघांनाही सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
८ नोव्हेंबर
या दिवशी विभागाने दोन मोठ्या कारवाया केल्या.
पहिल्या प्रकरणात, बँकॉकहून आलेल्या विमानातील दोन प्रवाशांकडून ₹३.९९ कोटींचा गांजा जप्त करण्यात आला.
तर त्याच दिवशी नैरोबीहून आलेल्या प्रवाशाकडून ₹३७.७४ लाखांचे सोने जप्त करण्यात आले. सोने विमानप्रवासादरम्यान चतुराईने लपवले गेले होते, पण सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सूक्ष्म तपासणी करून तो साठा शोधून काढला.
९ नोव्हेंबर
सलग चौथ्या दिवशी पुन्हा सीमाशुल्कने धडक कारवाई करत बँकॉकहून आलेल्या विमानातील प्रवाशाकडून ₹२.९४ कोटींचा उच्च प्रतीचा गांजा जप्त केला. या प्रकरणातही एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
एकूण आकडेवारी
चार दिवसांत पाच स्वतंत्र कारवाया
एकूण जप्त गांजा – सुमारे १० किलोपेक्षा अधिक
एकूण किंमत – सुमारे ₹१४ कोटी
अटक केलेले प्रवासी – ७ जण
जप्त सोने – ₹३७.७४ लाख मूल्याचे
![]()

