अफवा नव्हे सत्य वाचा – धर्मेंद्र जिवंत आहेत
सोशल मीडियावर पसरलेला खोटा धसका — पण सत्य स्पष्ट.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर —मुंबई
मंगळवार – ११ नोव्हेंबर २०२५
सोशल मीडियावर आज सकाळपासून “धर्मेंद्र गेले” अशी अफवा धडाधड पसरली. अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप्स, युट्यूब चॅनेल्स आणि फेसबुक पेजेसनी हा खळबळजनक दावा केला. मात्र प्रमाणित सूत्रांनी ह्या सर्व अफवांना खंडित केले आहे — धर्मेंद्र जिवंत आहेत!
त्यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील Breach Candy Hospital मध्ये श्वास घेण्यास त्रास झाल्याने दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांच्या कुटुंबीयांनी आणि त्यांच्या टीमने अधिकृतपणे सांगितले की, त्यांची स्थिती स्तिर असून ते उपचाराधीन आहेत.
त्यांची पत्नी हेमा मालिनी, मुलगी ईशा देओल व सुपुत्र सनी देओल यांनी एकत्रितपणे स्पष्ट केले आहे —
धर्मेंद्र स्थिर अवस्थेत आहेत, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका…
सोशल मीडियावर या प्रकारच्या अफवांनी घडविलेला गोंधळ पुन्हा एकदा लक्षवेधी आहे. ‘छावा’ पोर्टल म्हणून आम्ही सांगतो — क्लिक्ससाठी जीवन घेतले जाणे चालणार नाही. सत्य आणि जबाबदारी हाच पत्रकारितेचा पाया आहे.
छावा म्हणतो – धर्मेंद्र जिवंत आहेत!
अफवा नव्हे, सत्य वाचा. तब्येत स्थिर आहे आणि लाखो चाहत्यांच्या शुभेच्छांनी ते लवकरच बरे होतील.
छावा — सत्याचा आवाज, जबाबदार पत्रकारितेचा निर्धार.
![]()

