दिल्ली स्पोटानंतर रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट – रेवदंडासह सागरी भागात चोख बंदोबस्त, सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
दिल्ली येथे झालेल्या भीषण स्फोटानंतर राज्यभरात सुरक्षेची पातळी वाढवण्यात आली असून, रायगड जिल्ह्यातील सर्व सागरी भाग, किनारे आणि पर्यटन स्थळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर —रेवदंडा मंगळवार – ११ नोव्हेंबर २०२५
पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड-अलिबाग – सागरी सुरक्षा शाखा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, सागर रक्षक दल, गाव सुरक्षा दल व मच्छीमार संघटनांना उच्च सतर्कतेवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
किनारी भागात तसेच गावांमध्ये संशयित हालचाली, बोटींची ये-जा, तसेच अनोळखी व्यक्तींबाबत चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी लँडिंग पॉईंट्स, फिशिंग हार्बर, बीच, घाट, जेट्टी, रिसॉर्ट्स, हॉटेल्स, लॉज, धर्मशाळा आणि पर्यटकांची गर्दी असलेल्या ठिकाणी तातडीने तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
रात्रंदिवस गस्त पथके तैनात असून, सर्व सागरी चौक्यांवर आणि पर्यटन क्षेत्रात गुप्त गस्त (Secret Patrolling) वाढवण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की:
कोणत्याही संशयास्पद हालचालीकडे दुर्लक्ष न करता तात्काळ माहिती द्यावी.
सागरी किनाऱ्यावर, बंदर परिसरात आणि गावातील संवेदनशील भागात
नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून सतर्कता वाढवावी.”
रेवदंडा परिसरात:
गावातील तरुण मंडळे, बोट मालक, मच्छीमार व पर्यटन व्यवसायिकांना पोलिसांनी थेट सूचना दिल्या आहेत.
कोणतीही संशयित बोट, वाहन किंवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिस ठाणे अथवा सागरी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक:
एपीआय श्री. किरवले – 8850538782
सागरी अंमलदार पो. ना. गव्हाणे – 9922947751
गोपनीय अंमलदार पो. ना. शिंदे – 8698967860
आपत्कालीन क्रमांक – 112
सागरी सुरक्षा शाखेचे आवाहन:
सर्व गाव सुरक्षा दल, मच्छीमार संघटना आणि स्थानिक नागरिकांनी आपल्या परिसरात लक्ष ठेवावे.
गावात कोणी अनोळखी इसम राहायला आला असल्यास किंवा कुठेही संशयास्पद हालचाल आढळल्यास
ताबडतोब पोलिसांना कळवा — कारण आपली सतर्कता म्हणजेच किनाऱ्याची सुरक्षा
सतर्क राहा – सुरक्षित राहा
![]()

