कोकणात थंडीचा कडाका! पावसाच्या आठ महिन्यांच्या निरोपानंतर गारठलेल्या हवेत बदल दोन दिवसांपासून तापमान झपाट्याने खाली
कोकण किनारपट्टीवर तब्बल आठ महिन्यांच्या पावसाळी अधिराज्यानंतर आता हवामानाने पूर्णत: करवट घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत तापमानात झपाट्याने घसरण होत असून, थंडीने अक्षरशः अंग गोठवायला सुरुवात केली आहे.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर —रेवदंडा मंगळवार – ११ नोव्हेंबर २०२५
अलिबाग, पनवेल, पेण, मुरुड, उरण परिसरात रात्रीचे तापमान १९ ते २0 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले आहे.
मुंबईत सलग दोन दिवस २० अंशांखाली तापमान नोंदवले गेले असल्याची नोंद आहे. तर भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील अंतर्गत भागांत (नाशिक, पुणे, सातारा) तापमान ११ ते १३ अंशांपर्यंत खाली आले आहे.
रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून गाडीवरून प्रवास करणारे वाहनचालक सांगतात
उशिरा रात्री प्रवास करताना थंड वाऱ्याने चेहरा आणि हात सुन्न पडतात… अशी थंडी यंदा पहिल्यांदाच जाणवते.
पहाटेच्या वेळी दाट धुके, रस्त्यांवर दवाचा ओलावा आणि गार हवेमुळे परिसरात एक वेगळाच हिवाळी अनुभव निर्माण झाला आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाज वर्तवला असून, सकाळ-संध्याकाळ बाहेर पडताना उबदार कपडे वापरण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.
![]()

