रविवार विशेष रायगडचा महादरवाजा सुकी लाकडे आणि जिवंत इतिहास

रविवार विशेष 

या लेखातील माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक बखरी, रायगड किल्ल्यावरील पुरातत्त्व विभागाच्या संदर्भ नोंदी, तसेच इतिहास संशोधकांच्या लेखनावर आधारित आहे.

माहितीचे सादरीकरण “छावा” पोर्टलच्या संपादकीय अभ्यासातून केलेले आहे.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – रेवदंडा — सचिन मयेकर रविवार – ०२ नोव्हेंबर २०२५

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड बांधताना प्रत्येक घटकात नेमकेपणा आणि कारागिरीचे तत्त्व पाळले. त्यांचा आदेश स्पष्ट होता — “ओलं लाकूड वापरायचं नाही! फक्त पूर्णपणे वाळवलेली, सुकी लाकडेच वापरायची.”ओले लाकूड कोरडे होताना आकसते, फाटते आणि तडे जातात. महाराजांना हे अचूक ठाऊक होतं. त्यामुळे त्यांनी किल्ल्यांच्या दरवाज्यांसाठी किमान एक ते दोन वर्षे वाळवलेली सागवान लाकडेच वापरण्याचा नियम घातला होता. असे लाकूड वजनाने घट्ट, टिकाऊ आणि हवामानाच्या बदलांना न झेपणारे ठरते. त्यामुळे दरवाजे शतके ओलांडून टिकले. रायगडचा महादरवाजा बनवताना सागवान हे मुख्य लाकूड वापरले गेले. ही लाकडे रायगड-पोलादपूर-चिपळूण परिसरातील जंगलांतून आणून प्रथम उन्हात आणि सावलीत वाळवून मगच सुतारांनी आकार दिला. त्यासाठी स्वतंत्र लाकूड शेड तयार केली जायची.दरवाज्याचे बांधकाम “काऊ पद्धतीने” म्हणजे लाकडात लोखंडी खिळे न वापरता लाकडी जोडांनी केले गेले. ही पद्धत महाराजांच्या काळात सुतार स्वतःचे कौशल्य वापरून करीत असत. त्यांच्या हातची जोड इतकी घट्ट असायची की लोखंडापेक्षाही मजबूत नातं त्या लाकडात निर्माण व्हायचं.शिवाजी महाराज कधीच झाडं अंधाधुंद तोडत नसत. त्यांनी नेहमीच संतुलन राखलं. जिथे दरवाजा, बुरुज किंवा आरमारासाठी लाकूड लागे, तिथे फक्त निवडक आणि जुनी झाडंच तोडली जात. ओलं लाकूड तोडण्यास त्यांचा स्पष्ट विरोध होता.महाराजांच्या प्रशासनात “लाकूडफाटा खातं” नावाचं स्वतंत्र विभाग होतं. प्रत्येक झाडाचा हिशेब ठेवला जायचा — कुठून आलं, कुठे वापरलं, किती शिल्लक. आजच्या भाषेत सांगायचं तर त्यांनी त्या काळातच “सस्टेनेबल फॉरेस्ट मॅनेजमेंट” राबवली होती.महाराज नेहमी म्हणत, “किल्ला फक्त दगडाचा नसतो — त्याच्या प्रत्येक लाकडात मराठ्यांचा श्वास असतो.” त्यामुळे त्यांनी बांधकाम करताना माप, दिशा, लाकडाचा प्रकार, आर्द्रता, वाळवण आणि साठवण यावर स्वतः लक्ष दिलं.रायगडचा दरवाजा म्हणजे फक्त लाकूड नाही, तो महाराजांच्या दूरदृष्टीचा, कारागिरांच्या हातगुणांचा आणि पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या शासनदृष्टीचा ठसा आहे. तो अभिमानाचा दरवाजा आहे — जो आजही प्रत्येक मराठी मनात अभेद्य उभा आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *