⚡ राजधानी रायगडावर ₹४१ हजारांचं वीजबिल थकले
जिथं छत्रपतींचा राज्याभिषेक झाला, तिथं आज अंधाराचं सावट पसरण्याची शक्यता
छावा डिजिटल न्यूज पोर्टल –रायगड — सचिन मयेकर शुक्रवार – ३१ ऑक्टोबर २०२५
जिथं शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची घोषणा केली…जिथं जयजयकारांनी डोंगर हादरले…त्या रायगड किल्ल्यावर आज अंधाराचं साम्राज्य पसरायची वेळ आली आहे.तब्बल ₹४१ हजारांचं वीजबिल थकलं असून, महावितरण विभागाने वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.म्हणजेच शिवरायांच्या राजधानीतच दिवा मालवायची वेळ आलीय हे ऐकून प्रत्येक शिवभक्ताचं हृदय हळहळून उठलं आहे.जिथं महाराजांनी सिंहासनासमोर शपथ घेतली, तिथं आता अंधार पसरतोय.रायगड हा केवळ एक डोंगर नाहीतो आहे महाराष्ट्राच्या आत्म्याचा दीपस्तंभ.याच गडावर ६ जून १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.याच गडावरून त्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उजळवलं…आणि आज त्या पवित्र भूमीवर वीज थकबाकीमुळे अंधाराचं सावट येणं, ही लाज राज्यव्यवस्थेची नाही तर आपल्या सर्वांच्या संवेदनांची आहे.
⚡ वीजबिल थकलं, पण श्रद्धेचा दिवा विझणार नाही.
महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी नोटीस देण्यात आली आहे.स्थानिक प्रशासन निधीअभावी असं म्हणत आहे…पण प्रश्न असा राजमाता जिजाऊंच्या गडावर पैसा संपतो, आणि फटाके-प्रसंगांवर कोट्यवधी उडतात का.रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांचा राग अनावर आहे.एक शिवभक्त म्हणतो हा गड फक्त दगडांचा नाही, तो आपल्याच आत्म्याचा तुकडा आहे.त्यावर अंधार पडू देणार नाही, जरी सरकारने विसरले तरी आम्ही नाही विसरणार.किल्ल्यावर दररोज हजारो पर्यटक येतात.रात्रीचा प्रकाश त्यांना स्वराज्याची जाणीव करून देतो.तोच प्रकाश आता थांबणार का?जर असं झालं, तर तो फक्त दिव्यांचा अंधार नसेलतो आपल्या इतिहासावरील दुर्लक्षाचं प्रतीक ठरेल.राज्य सरकार, महावितरण आणि पुरातत्त्व विभाग यांनी तात्काळ पुढाकार घेतरायगडचा वीजपुरवठा कायम ठेवावा, आणि थकबाकी तत्काळ भरावी,ही शिवभक्तांची एकमुखी मागणी आहे.
🟠 छावा
रायगडावर दिवा मालवू देणार नाही…कारण त्या ज्योतीत अजूनही शिवरायांचा श्वास आहे.🔥
![]()

