अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी

दीपावली उत्सवानंतर आलेल्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या काळात कामाच्या ठिकाणी फक्त एकच शुक्रवार असल्याने अनेकांनी तो दिवसही सुट्टी घेऊन सलग आठवडाभराचा विश्रांतीचा आनंद लुटला.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर–अलिबाग  शनिवार २५ ऑक्टोबर २०२५

सकाळपासूनच किनाऱ्यावर पर्यटकांची वर्दळ सुरू असून दुपारनंतर समुद्रकिनारा अक्षरशः गजबजलेला दिसत आहे. पर्यटकांनी समुद्रातील होड्यांची सफर, घोडेस्वारी, उंटस्वारी तसेच चारचाकी गाड्यांवरून किनाऱ्यावर फेरफटका मारत आनंद घेतला.

अलिबागचा ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठीही मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली. संध्याकाळच्या ओहोटीच्या वेळी किल्ल्याकडे पायी जाणाऱ्या भाविकांची रांग लांबच लांब पसरलेली दिसली.

पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अलिबाग पोलिसांनी किनाऱ्यावर बंदोबस्त ठेवला असून पर्यटकांनी सुरक्षिततेच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *