रेवदंड्यात फ्लिपकार्ट डिलिव्हरी बॉयचं साडेसात हजारांचं पार्सल रहस्यमयरीत्या गायब
गोळा स्टॉप ते बाजारपेठ दरम्यान हरवलेली फ्लिपकार्टची सफेद बॅग सापडल्यास संपर्क साधा — छावा न्यूज पोर्टल चे नागरिकांना आवाहन…. 📞 संपर्क क्रमांक: 9325096815
छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– रेवदंडा मंगळवार – २१ ऑक्टोबर २०२५
रेवदंडा परिसरात काल सायंकाळी सुमारे ५:२५ वाजता घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. फ्लिपकार्ट कंपनीचा प्रामाणिक डिलिव्हरी पार्टनर आतीश पोळेकर याचं सुमारे ₹७,५०० किंमतीचं कुरिअर पार्सल डिलिव्हरीदरम्यान रहस्यमयरीत्या हरवले आहे. ही घटना गोळा स्टॉप ते बाजारपेठ, रेवदंडा या मार्गावर घडली. आतीश नेहमीप्रमाणे आपल्या टू व्हीलर वर फ्लिपकार्टची सफेद बॅग बांधून पार्सल डिलिव्हरी करत होता. त्याच बॅगमध्ये अनेक ग्राहकांची पार्सल होती. काल संध्याकाळी तीच बॅग अचानक गायब झाली, आणि त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू झाली. आतीश पोळेकर हा तरुण गेली अनेक वर्षांपासून रेवदंडा विभागात फ्लिपकार्टची पार्सल डिलिव्हरी करत असून, तो प्रामाणिक आणि जबाबदार म्हणून ओळखला जातो. घटना लक्षात येताच त्याने स्वतःहून मॅनेजरला माहिती दिली आणि प्रामाणिकपणे कबूल केलं. त्याच्या या प्रामाणिकपणाचं आणि धैर्याचं स्थानिक नागरिकांकडून मोठं कौतुक केलं जात आहे. नागरिकांनी म्हटलं आहे की, “आजच्या काळात अशा प्रामाणिक मुलांमुळेच समाजात विश्वास टिकून आहे. कंपनीने या तरुणाला साथ द्यावी, दंड नव्हे.”
छावा न्यूज पोर्टल तर्फे सर्व नागरिकांना आवाहन जर कोणाला फ्लिपकार्टची सफेद बॅग गोळा स्टॉप ते बाजारपेठ या परिसरात सापडली किंवा त्याबाबत काही माहिती असल्यास कृपया खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.9325096815
ठिकाण: गोळा स्टॉप – बाजारपेठ, रेवदंडा घटनेची तारीख: 20 ऑक्टोबर 2025, सायं. 5:25 वा.
![]()

