जिंदाल विद्यामंदिर साळाव येथे फॅन्सी ड्रेस रॅम्पवॉकमध्ये पालक–पाल्यांचा रंगतदार जल्लोष!
जिंदाल विद्यामंदिर, साळाव येथे आज बालवर्गातील (नर्सरी, एल.के.जी., यू.के.जी.) विद्यार्थ्यांसाठी आकर्षक फॅन्सी ड्रेस रॅम्पवॉक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– साळाव सोमवार – १३ ऑक्टोबर २०२५
या कार्यक्रमाची विशेष थीम “आईसोबत रॅम्पवॉक” अशी होती. या अनोख्या उपक्रमात आई आणि लहानगे यांनी एकत्र रॅम्पवॉक करत विविध गाण्यांवर सुंदर सादरीकरणे केली.
या कार्यक्रमात सुमारे ४२ आईंनी आपल्या मुलांसोबत सहभाग घेतला आणि सर्वांनी मिळून अप्रतिम कलाविष्कार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
रॅम्पवॉकदरम्यान मुलांनी विविध फॅन्सी ड्रेस परिधान करून सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर आकर्षक सादरीकरणे केली. गाण्यांच्या तालावर रंगलेली ही सादरीकरणे प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरली.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नीलू मलिक उपस्थित होत्या.
या प्रसंगी मुख्याध्यापक श्री. मुकेश ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले
पालकांनी आपल्या मुलांमध्ये संयम आणि आत्मविश्वास वाढवावा. कारण ज्यांच्यात संयम असतो, तीच मुले पुढे जाऊन आपले करिअर घडवतात आणि समाज तसेच देशाचे नाव उज्ज्वल करतात.”
या कार्यक्रमाच्या यशामागे शिक्षिका सविता जॉय, अनन्या घरत, मेहवीश तांडेल आणि अफीह बास्सा तसेच औदुंबर ढगे यांचे विशेष योगदान राहिले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी शिक्षकवृंद आणि व्यवस्थापन समितीचे मोलाचे सहकार्य लाभले.
पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा रॅम्पवॉक कार्यक्रम अत्यंत रंगतदार, भावनिक आणि संस्मरणीय
![]()

