दुचाकी अपघातात गंभीर जखमा; भारती मोरे घटनास्थळी धावून जखमींना प्राथमिक उपचार; नागरिकांची स्पीड ब्रेकरसाठी मागणी..

रेवदंडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा बुधवार – ०७ ऑक्टोबर २०२५

शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी रेवदंडा हायस्कूलसमोर एका बिगारी कामगाराला वेगाने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली.धडक इतकी जोरात होती की तो रस्त्यावर कोसळला आणि गंभीर दुखापत झाली. उपस्थित ग्रामस्थांनी तत्परता दाखवत दुचाकीस्वाराची गाडीची चावी काढून घेतली आणि जखमीला तात्काळ प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल नेले.

दरम्यान, सोमवारी (दि. ६ ऑक्टोबर) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास रेवदंडा-खार जवळ शुभांगी घरत ही महिला दुचाकीवरून रेवदंडा येथील दवाखान्याकडे येत असताना, एका चारचाकी वाहनाने तिला कट मारला. तिचा तोल गेला आणि ती रस्त्यावर कोसळली. तिला लागल्यामुळे खालच्या ओठात खोल जखम झाली आणि नाकाला छोटा फ्रॅक्चर झाला आहे.

घटनास्थळाजवळच रेवदंडा सरपंच प्रफुल्ल यशवंत मोरे यांचे हॉटेल असल्याने, आवाज ऐकून त्यांच्या पत्नी भारती मोरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी महिलेला वाहनातून रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार करून दिले, त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पाठवले.

रेवदंडा परिसरात वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. बाजारपेठेसह गर्दीच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी मागणी जोर धरत आहे. ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत पत्र पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, बेधुंद दुचाकी चालविणे आणि रस्त्यांची दुरवस्था हे अपघातांना मुख्य कारण आहे. अलीकडेच रेवदंडा बाजारपेठेतील ज्येष्ठ व्यापारी पारसमलजी जैन यांच्या अपघाती मृत्यूनंतर ग्रामस्थांमध्ये भीती आणि संताप दोन्ही वाढले आहेत.याआधी गोळास्टॉपजवळ सुधा एस. टी. बस ने एका वृद्ध महिलेला चिरडल्याची घटना घडली होती.

रेवदंडा-अलिबाग मार्ग सध्या पूर्णपणे खराब अवस्थेत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष स्पष्ट दिसून येते. नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे — ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे..अन्यथा “रेवदंड्यातील रस्ते लोकांचे जीव घेत राहतील,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *