रविवार विशेष 💥 रायगडावर उधारीची वसुली करायला आले इंग्रज — काय केले महाराजांनी?
“स्रोत: Bombay Council Records (British Factory Records, 1660–1663) आणि मराठा शौर्यवृत्तांतांवर आधारित.”
सन १६६०. पन्हाळगडावर आदिलशाहीचा सेनानी सिद्दी जोहर यांनी मोठा वेढा घातला होता. चारही बाजूंनी शत्रू, मुसळधार पाऊस, आणि गडावर अन्नधान्य संपत चाललेलं. पण शिवाजी महाराजांसाठी हा फक्त संकटाचा काळ नव्हता हा चातुर्य, शौर्य आणि गनिमी धोरण दाखवण्याचा वेळ होता.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा रविवार – ०५ ऑक्टोबर २०२५
मोहिमेत शिवा काशिद आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी वीरमरण पत्करले. ही रात्रीची ‘पन्हाळगड ते विशाळगड सुटका’ होती, जिथे मावळ्यांच्या शौर्याने इतिहास घडवला आणि स्वराज्याची प्रतिष्ठा अजरामर झाली.
इंग्रजांची मदत आणि सिद्दी जोहर
Bombay Council Records (British Factory Records) मध्ये नोंद आहे:
“Shivajee, having escaped from the siege of Panalla, reached Vishalgad safely, though he lost two of his most valiant commanders in the encounter. The Siddy (Siddi Johar) was aided with arms and men by the English Company.”
(अनुवाद:)
“शिवाजी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटून विशाळगडावर पोहोचले, पण या युद्धात त्यांचे दोन शूर सेनापती मृत्युमुखी पडले. सिद्दी जोहर याला इंग्रज कंपनीकडून शस्त्रास्त्रे आणि सैनिकांची मदत मिळाली होती.”
इंग्रज अधिकारी हेनरी रीव्ह (Henry Reeve) यांनी सिद्दी जोहरला गोळाबारूद, दारूगोळा आणि जहाजांची मदत पुरवली.
या घटनेमुळे महाराजांचा इंग्रजांवरील विश्वास पूर्णपणे ढासळला. मनाशी त्यांनी ठरवले:
“यांना एक दिवस स्वराज्याची ताकद काय असते, हे दाखवायचंच.”
या वेळी बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशिद यांनी स्वराज्यासाठी वीरमरण पत्करले. त्यांच्या शौर्यामुळे महाराज भावनिक झाले, आणि इंग्रजांनी सिद्दी जोहरला मदत केली हे पाहून त्यांचा राग तर चढलाच; पण त्याचबरोबर त्यांनी आपल्या स्वराज्याच्या ताकदीचा निर्णय ठामपणे घेण्याचे ठरवले.
इंग्रजांकडून उधारी का घेतली?
शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य अजून उभारणीच्या टप्प्यात होतं. राजा असला तरी तो “दरबारात बसलेला सम्राट” नव्हता तो जनतेच्या हाडामांसातून स्वराज्य उभारणारा सैनिक राजा होता.
त्या काळात स्वराज्याची सेना, गड, शस्त्रसाठा, नौदल आणि गनिमी मोहिमा चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागायचा. आदिलशाही, मोगल, सिद्दी तिन्ही शत्रूंशी एकाच वेळी सामना चालू होता.
बॉम्बे (Bombay) आणि सुरत (Surat) येथील इंग्रज East India Company व्यापार करत होती. त्यांच्या जवळ शस्त्रसामुग्री, तोफा, जहाजं आणि पैसा विपुल प्रमाणात होता.
शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि गनिमी मोहिमांसाठी आवश्यक तोफा व गोळाबारूद मिळवण्यासाठी इंग्रजांकडून उधार घेतला.
“आता तुम्ही पैसे द्या, आम्ही तो व्यापारातून वा मोहिमेनंतर परत देऊ.”
हे कोणतंही दास्यभाव नव्हतं महाराजांचे धोरण व्यवहारिक आणि रणनीतीप्रधान होते.
महाराजांची रणनीती
शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी सौम्य संबंध राखले, परंतु लक्षात ठेवलं की:
१). कोणताही परकीय स्वार्थ स्वराज्यावर प्रबळ होऊ नये.
२). इंग्रज सध्या व्यापारी आहेत, पण भविष्यात भारतावर लक्ष ठेवतील.
३). सौम्य व्यवहार ठेवा, अंतरही राखा.
इंग्रजांनी सिद्दी जोहरला मदत केली, त्यामुळे महाराजांना त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण झाले. तरीही त्यांनी व्यापार आणि नौदल चालवण्यासाठी संबंध ठेवले, आणि स्वराज्याचे रक्षण केले.
Bombay Factory Records, 1662 मध्ये उल्लेख आहे:
“The Maratha Chief Shivajee borrowed a sum from the English Factory to procure war material and ordnance for his forts, promising repayment after the monsoon campaigns.”
(अनुवाद:)
“मराठा प्रमुख शिवाजी यांनी त्यांच्या गडांच्या लढाईसाठी लागणाऱ्या शस्त्रसामुग्रीसाठी इंग्रजी फॅक्टरीकडून काही रक्कम उधार घेतली, आणि पावसाळ्यानंतर ती परत देण्याचं आश्वासन दिलं.”
परतफेड चांदीतून
इंग्रजांनी पैसे मागितले, पण महाराजांनी स्पष्ट सांगितले:
“आमच्या खजिन्यात रोकड नाही, पण आमच्याकडे चांदी आहे आणि आमचा वचन म्हणजे देवाचा शब्द.”
म्हणून रुपयांऐवजी चांदीचे तोळे/तुकडे दिले. उदाहरणार्थ, ज्या चांदीचा खरे भाव २३ रुपये होता, महाराजांनी २८ रुपयांचा भाव दिला इंग्रजांना थोडंसं नुकसान, पण स्वराज्याचे हित राखले.
हे इंग्रजांसाठी आर्थिक नफा नव्हता, पण महाराजांनी दाखवले की स्वराज्याचे अर्थकारण परकीयांवर अवलंबून नाही.
नंतर काय झाले?
जेव्हा इंग्रज अधिकारी रायगडावर आले, तेव्हा महाराज परत आले नव्हते. त्यांनी राजमाता जिजाऊ आणि सभासद मंडळाला राज्यकारभार सांभाळायला सांगितले होते.
इंग्रज अधिकारी उद्धटपणे वागले; आवाज चढवला आणि सैनिकांशी गैरवर्तन केले. महाराज परतल्यावर संतापले आणि आदेश दिला की त्या इंग्रज अधिकाऱ्याला कैद करा.
यामुळे शिवाजी महाराज आणि इंग्रजांमध्ये काही काळासाठी तणाव निर्माण झाला.
१. उधारीचे पैसे नौदल आणि युद्धसामग्रीसाठी घेतले.
२. परतफेड चांदीतून केली, इंग्रजांना थोडंसं नुकसान, पण स्वराज्याचे हित राखले.
३. महाराजांनी इंग्रजांशी सौम्य पण कडक धोरण ठेवलं, आणि स्वराज्याचा ठसा कायम ठेवला.
“सिंहाला जर शिकार हवी असेल, तर तो परिस्थितीचं जंगल समजून चालतो, आणि प्रत्येक हालचालीत गनिमी धोरण ठेऊन चालतो.”
![]()

