परप्रांतीयाचा बेधुंद वाहन चालवण्याचा निष्काळजीपणामुळे प्रचंड फटका — रेवदंडा ज्येष्ठ नागरिक व्यापाऱ्याचा जीव गेला!
रेवदंडा बाजारपेठ परिसरात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात पारसमल बाबूलाल जैन (वय ७५ वर्षे) यांचा मृत्यू झाला.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर रेवदंडा— शनिवार — ०४ ऑक्टोबर २०२५
मिळालेल्या माहितीनुसार, मयत पारसमल बाबूलाल जैन मंदिराजवळून स्वतःच्या घराकडे पायी चालत जात होते, तेव्हा रेवदंडा बाजूकडून मुरुडच्या दिशेने येणारी होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल (वाहन क्रमांक एम.एच.-०६ सी.एन. ३८४४) आरोपीत चालक रत्नेश रामबाबू निशाद याने बेधुंद, प्रचंड वेगाने बाजारपेठेतून तुफान चालवली.
त्यामुळे एक ज्येष्ठ नागरिक, व्यापारी विनाकारण मृत्यूमुखी पडले, फक्त या वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि परप्रांतीयांच्या असावधानपणामुळे.
ग्रामस्थांचा संताप प्रचंड आहे — परप्रांतीयांच्या बेधुंद गाडी चालवण्यामुळे बाजारपेठेत नागरिक सुरक्षित नाहीत, रोजच्या व्यापारावर परिणाम होतो आहे आणि संपूर्ण रेवदंडा समाज या घटनेने धक्का बसलेला आहे. ग्रामस्थ ठसठशीत राग व्यक्त करत आहेत.
अपघातात सहभागी असलेला रत्नेश रामबाबू निशाद, वय २३ वर्षे, सध्या रेवदंडा मोठे बंदर, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथे राहतो आणि मासेमारीचा व्यवसाय करतो. त्याचा मूळ गाव साढापूर, देवड, जिल्हा सुलतानपूर, उत्तर प्रदेश आहे.
रेवदंडा पोलिस ठाण्यात फिर्याद किशोर पारसमल जैन यांनी दिली आहे.
घटनेनंतर आरोपी रत्नेश रामबाबू निशाद यांना अटक करण्यात आली असून, भारतीय न्याय संविधान कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), १८४ अन्वये कारवाई सुरू आहे.
गुन्हा नोंद रजिस्टर क्रमांक १३१/२०२५ रेवदंडा पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलीस तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई एन.आर. आंगज करीत आहेत.
टीप: सदर ज्येष्ठ नागरिक व्यापारी पारसमल बाबूलाल जैन यांचे अंत्यसंस्कार उद्या, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात येणार असल्याचे समजते.
![]()

