भीमाची वाघीण – एकटी भिडली!
सिंहगड लॉ कॉलेजच्या कॅम्पसवर दिव्या शिंदेचा अन्यायाविरुद्ध आवाज
छावा डिजिटल न्यूज पोर्टल, पुणे — १ ऑक्टोबर
सिंहगड लॉ कॉलेज, अंबेगाव येथे दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली.

दिव्या शिंदे या विद्यार्थिनीने कॉलेज प्रशासनालाच सरळसरळ प्रश्न विचारले
देणगी घेऊन प्रवेश द्यायचा हा शिक्षणाचा बाजार आहे का?”
क्षणात संपूर्ण कॅम्पस हलला.
अनेकजण गप्प राहिले, पण ही भीमाची लेक जणू ‘बाघिण’ बनून एकटीच अन्यायाविरुद्ध भिडली.
दिव्या शिंदेचा आरोप स्पष्ट आहे –
*“डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन”*च्या नावाखाली तिचा प्रवेश नाकारण्यात आला.
त्याचवेळी कॅम्पसवर देणगी (₹३ लाखांपर्यंत) मागितल्याच्या चर्चा रंगल्या.
ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांचं स्वप्नं दाबलं जातं, हा अन्याय थांबायला हवा.
दिव्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला, पण तिची जिद्द सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली.
दोन दिवसांत महाराष्ट्रभरात या प्रकरणावर चर्चा रंगली आहे.
कॉलेज प्रशासनाकडून मात्र अजूनही अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही.
🚩 छावाचा गौरव
छावा परिवार तर्फे दिव्या शिंदेच्या धैर्याला मनःपूर्वक सलाम.
ती एकटी भिडली, पण तिच्या मागे आता हजारो तरुणांचे मन उभे आहे.
शिक्षण हे हक्काचं आहे – ते पैशाने विकत घेता येत नाही, हा संदेश दिव्याने जगासमोर ठेवला आहे.
![]()

