थेरोंडा समुद्रकिनारी अनोळखी मृतदेह सापडला
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेरोंडा खंडेराव पाडा येथे आज समुद्रकिनारी एक अनोळखी मृतदेह सापडला. सदर मृतदेह समुद्राच्या लाटांबरोबर वाहत येऊन किनाऱ्यावर आला होता.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर —रेवदंडा — शनिवार २७ सप्टेंबर २०२५
मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे, विशेषतः कवटीवरील मांस नष्ट झाल्याने, ओळख पटविणे शक्य झालेले नाही. या संदर्भात रेवदंडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

![]()

