सागरी सुरक्षा चषक २०२५ : रेवदंडा किनारी कबड्डी सामन्यांत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती
सागरी सुरक्षा व मच्छीमार बांधव यांच्यासाठी आयोजित सागरी सुरक्षा चषक २०२५ अंतर्गत दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी रेवदंडा समुद्रकिनारी दुपारी तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत रंगतदार कबड्डी सामने पार पडले. या सामन्यांना मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची उपस्थिती लाभली.
सचिन मयेकर ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १९ सप्टेंबर २०२५
सामन्यांचे उद्घाटन श्रीफळ वाढवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. पोलीस महानिरीक्षक कोकण परीक्षेत्र श्री संजय दराडे, मा. रायगड पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री अभिजित शिवथरे आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती माया मोरे हे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पाखरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले, पोलीस उपनिरीक्षक संजय मोकल, पोह/ऋषिकेश नामदेव साखरकर स्पोर्ट्स इन्चार्ज रायगड,अधिकारी पडवळ, मनीष ठाकूर, सिद्धेश शिंदे, गांगुर्डे, गव्हाणे, आदी पोलिस कर्मचारी, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ पाटील, निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील, सागरी सुरक्षा दल प्रमुख सुहास घोणे व सदस्य, शिवसेना ( शिंदे गट ) तालुका प्रमुख आनंत गोंधळी, रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्ल मोरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रकुमार सदाशिव वाडकर, दुषांत झावरे तसेच सौ.भारती मोरे, रेवदंडा ठाणे महिला दक्षता समिती सदस्य शलाका राऊत, भगीरथ पाटील, गजानन झेंडेकर, सुभाष शेळके, अल्केश जाधव, राजेश चुनेकर, मिलिंद साखळे, मंगेश वडके आणि पोलिस पाटील स्वप्निल तांबडकर यांचीही उपस्थिती होती.
आजचे सामने पुढीलप्रमाणे पार पडले
१) रेवदंडा विरुद्ध पोयनाड
२) नागोठणे विरुद्ध अलिबाग
३) पोयनाड विरुद्ध नागोठणे
प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी सादर केलेल्या झुंजार चढाओढीला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. समुद्रकिनाऱ्यावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या स्पर्धेच्या माध्यमातून मच्छीमार बांधव, सागर सुरक्षा दल व पोलीस दल यांच्यातील समन्वय वृद्धिंगत होऊन सागरी सुरक्षेला बळ मिळणार आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
![]()

