रविवार विशेष —अब भी सब पे भारी है “छावा”
हाथी-घोड़े, तोप-तलवारें, फ़ौज तो तेरी सारी है, पर ज़ंजीरों में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है।
सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १४ सप्टेंबर २०२५
छावा सब पे भारी है……
ही ओळ केवळ शब्द नाहीत तर इतिहासाच्या पानावर कोरलेला एक जाज्वल्य हुंकार आहे छत्रपती संभाजी महाराज कैदेत असतानाही त्यांचं तेज आणि धैर्य इतकं प्रखर होतं की औरंगजेबासारख्या बादशहाची लाखोंची फौज त्यांच्या निर्धारापुढे लहान भासत होती
सन १६८९ संगमेश्वरजवळ झालेल्या फितुरीत संभाजी महाराज पकडले गेले मुघलांनी त्यांना बेड्या घातल्या हातपाय जखडले पहारेकरी लावले हजारोंची फौज तैनात केली पण कैदेतला छत्रपती कुठल्याही कैद्याप्रमाणे नव्हता तो अजूनही सिंहासनावर बसलेला राजा वाटत होता त्याच्या नजरेतील ज्वाला त्याच्या बोलण्यातली धार आणि धर्मासाठी शरण न जाण्याचा अढळ निश्चय यामुळे मुघल दरबार हादरून गेला
औरंगजेबाजवळ सर्व सामर्थ्य होतं हत्ती होते घोडे होते तोफा होत्या लाखोंची सेना होती पण जंजीरांत जखडलेला छत्रपती त्याला घाबरवत होता कारण संभाजी महाराजांनी धर्मांतर नाकारलं धर्मासाठी अमानुष यातना सहन केल्या पण डगमगले नाहीत सत्य आणि स्वाभिमानासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत उभे राहिले म्हणूनच साहित्यिक वामन देशमुख आणि इतरांनी या वाक्यातून अमर प्रतिमा उभी केली की फौज तुझी सारी आहे पण माझा राजा अजूनही भारी आहे
आजही या ओळींचं महत्त्व तितकंच जिवंत आहे आज आपल्या हातात तलवारी नाहीत आपल्या पायाखाली घोडे नाहीत आपल्या आसपास तोफा नाहीत पण आयुष्य आपल्याला अडचणी संकटं अपमान आणि अपयशाच्या जंजीरांनी जखडतं मात्र संभाजी महाराज शिकवतात की खरी ताकद बाहेरच्या शस्त्रात नाही खरी ताकद मनोधैर्यात आहे संकट कितीही मोठं असलं बेड्या कितीही घट्ट असल्या तरी आत्मविश्वास आणि सत्यासाठी लढण्याची तयारी असेल तर कोणीही आपल्याला हरवू शकत नाही उलट आपणच जिंकतो
कैदेत असतानाही महाराजांच्या डोळ्यांतली ज्वाला त्यांच्या छातीतील धैर्य आणि त्यांच्या जिभेवरील निर्भीड वाणी हेच खरं सामर्थ्य होतं म्हणूनच ते आजही प्रेरणास्थान आहेत कैदेत असूनही राजा होता कैदेत असूनही अजिंक्य होता कैदेत असूनही तो औरंगजेबाच्या लाखो फौजेवर भारी ठरला
आजच्या पिढीने या इतिहासातून एकच धडा घ्यायला हवा की परिस्थिती कितीही बिकट असो मनोधैर्य आणि स्वाभिमान टिकवला तर आपण जिंकतो खरी लढाई शस्त्रांनी नाही तर आत्मविश्वासाने होते म्हणूनच ज़ंजीरों में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है।
![]()

