सागरी सुरक्षा चषक २०२५ : मांडवा, अलिबाग, रेवदंडा, मुरूड व श्रीवर्धन किनाऱ्यावर कबड्डी सामन्यांचा जल्लोष
सागरी सुरक्षा व मच्छीमार बांधव यांच्यासाठी आयोजित सागरी सुरक्षा चषक २०२५ या साखळी कबड्डी स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे दि. १३ सप्टेंबर २०२५ ते १७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मांडवा, अलिबाग, रेवदंडा, मुरूड व श्रीवर्धन या समुद्र किनाऱ्यावर करण्यात आले आहे. या स्पर्धेचा भव्य शुभारंभ १२ सप्टेंबर रोजी मांडवा येथे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक ऑचल दलाल यांच्या शुभहस्ते झाला.
सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १४ सप्टेंबर २०२५
रेवदंडा समुद्रकिनारा येथे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून साखळी कबड्डी स्पर्धेचा टप्पा १३ सप्टेंबर रोजी पार पडला. या प्रसंगी रेवदंडा पोलीस ठाण्याचे सपोनि श्रीकांत किरविले, सरपंच प्रफुल्ल मोरे ,रेवदंडा सागरी सुरक्षा दल प्रमुख सुहास घोणे व सदस्य , सलीम तांडेल तसेच ग्रामपंचायत सदस्य सुराराम माळी, दुष्यांत झावरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. आशिष धरणकर, शलाका राऊत , शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य संतोष मोरे यांच्यासह रेवदंडा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी एचसी महेंद्र राठोड, एचसी मनीष ठाकूर, पिएन सुग्रीस गव्हाणे, पिएन सिद्धेश शिंदे, पडवळ, गांगुर्डे तसेच पोलिस पाटील स्वप्नील तांबडकर , राजेश चुनेकर उपस्थित होते.
या स्पर्धेत रेवदंडा, नागोठणे, अलिबाग व पोयनाड या कबड्डी संघांमधील सामने पार पडले. दमदार चढाओढीने किनाऱ्यावर प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळाली. पंच म्हणून सहायक फौजदार नितीन समजीसकर, नंदकुमार पाटील, संजय मोकल, पोह विश्वनाथ म्हात्रे, अमोल नलावडे, स्वागत ठाकूर, पोना प्रणित पाटील, पोशि सुरज म्हात्रे, सर्वेश थळे, ज्ञानेश्वर पालवे यांनी काम पाहिले. तसेच रायगड जिल्हा स्पोर्टस् इन्चार्ज ॠषीकेश साखरकर, सपोनि रविंद्र पारखे, मारुती पाटील, चंद्रकांत बोरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेचे व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ पाटील यांनी केले.
स्पर्धेत रेवदंडा, नागोठणे, अलिबाग व पोयनाड या कबड्डी संघांमधील सामने रंगले. निकाल पुढीलप्रमाणे १) अलिबाग पोलीस ठाणे विरुद्ध पोयनाड पोलीस ठाणे
अलिबाग – २२ गुण, पोयनाड – ३५ गुण.
👉 पोयनाड पोलीस ठाणे १३ गुणांनी विजयी.
२) रेवदंडा पोलीस ठाणे विरुद्ध नागोठणे पोलीस ठाणे
रेवदंडा – २६ गुण, नागोठणे – २७ गुण.
👉 नागोठणे पोलीस ठाणे १ गुणांनी विजयी.
३) अलिबाग पोलीस ठाणे विरुद्ध रेवदंडा पोलीस ठाणे
अलिबाग – १५ गुण, रेवदंडा – २६ गुण.
👉 रेवदंडा पोलीस ठाणे ११ गुणांनी विजयी.
संपूर्ण रायगड जिल्हा सागरी हद्द मर्यादित अशी ही स्पर्धा असून दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी मांडवा येथील स्पर्धेत पेण, मांडवा, वडखळ आणि दादर सागरी पोलीस ठाणे संघांनी सहभाग घेतला होता. दि. १३ सप्टेंबर रोजी रेवदंडा येथे अलिबाग, पोयनाड, नागोठणे आणि रेवदंडा हे चार संघ सहभागी झाले होते. दि. १४ सप्टेंबर रोजी उर्वरित पोलीस ठाणे संघ मुरुड येथे रोहा, मुरुड, तळा आणि गोरेगाव हे संघ भिडतील. दि. १५ सप्टेंबर रोजी श्रीवर्धन येथे महाड, म्हसला, श्रीवर्धन आणि दिघी सागरी पोलीस ठाणे संघांचा सहभाग असेल. वरीलप्रमाणे अ, ब, क आणि ड गटातून प्रत्येकी एक संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. त्यानंतर विजयी होणारे दोन संघ अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी झुंजतील.
![]()

