अलिबाग मार्गावर खड्ड्यांचा कहर, धुरळ्याने त्रस्त नागरिक

बेलकडे ते अलिबागपर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण रस्त्यावर अतोनात खड्डे पडल्याने पावसाळ्यात पाणी तुंबून छोटे-मोठे अपघात घडत होते. मात्र तरीसुद्धा बांधकाम विभागाने कोणतीही ठोस दखल घेतली नाही.

सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. ११ सप्टेंबर २०२५

पावसाळा ओसरल्यानंतर या खड्ड्यांवर केवळ खडी व रेजगा टाकून देण्यात आला आहे. त्यामुळे काही दिवसात पुन्हा खड्डे उघडे पडले असून रस्त्यावर सतत धुरळा उडतो आहे. परिणामी वाहनचालक, पर्यटक व ग्रामस्थ यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः श्वसनाचे आजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांनी केवळ तात्पुरते काम न करता कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या रस्त्यावरील खड्डे व धुरळ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *