अन कोळी बांधवांनी समुद्राच्या पाण्यात अडकलेल्या राजाला धरून ठेवले

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. त्यातही लालबागचा राजा हा प्रत्येक मुंबईकराच्या हृदयात विराजमान झालेला बाप्पा. पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, “लालबागचा राजा आता अंबानी आणि गुजरात्यांचा राजा होत चाललाय”, अशी जोरदार टीका सुरू झाली आहे.
सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल ०८ सप्टेंबर २०२५
गिरगाव चौपाटीवर समुद्राच्या लाटांमध्ये लालबागचा राजा अडकला आणि त्या क्षणी कोळी बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता बाप्पाला धरून ठेवले. हा क्षण मुंबईकरांसाठी डोळ्यात पाणी आणणारा होता. पण कटू सत्य हेच की – समुद्रात बाप्पाला आधार देणारे हेच कोळी बांधव मंडळाच्या कारभारातून हद्दपार केले जात आहेत. ज्यांनी बाप्पाला पाण्यातून जीवाची पर्वा न करता धरून ठेवलं त्यांनाच बाहेरून आलेल्या पैशाच्या बादशाहांच्या हाती विकलं जातंय. आज बाप्पाला कोळी बांधवांचा हात लागला म्हणून विसर्जन पार पडलं, पण उद्या जर मंडळाने महाराष्ट्राची संस्कृती गुजरातकडे विकली तर बाप्पालाच विसर्जनासाठी परदेशी न्यावं लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे. म्हणूनच हा इशारा – बाप्पा आमचा आहे, मुंबईकरांचा आहे, त्याला पैशाने विकणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही!