मोबाईलवर खोटा मेसेज दाखवून स्पीकर घेऊन पोबारा करणारा आरोपी अखेर जेरबंद – रेवदंडा पोलिसांची थरारक कारवाई!

रेवदंडा बाजारपेठेत २ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २:४५ वाजता घडलेल्या स्पीकर फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

सचिन मयेकर – छावा डिजिटल न्यूज पोर्टल ०५ सप्टेंबर २५

Samcom कंपनीचा ७,५०० रुपयांचा स्पीकर मोबाईलवर खोटा “Payment to You Rs.7500 / Paid – 03.00 pm” असा मेसेज दाखवून घेऊन पसार झालेल्या या आरोपीविरोधात संगीता राजेंद्र जैन यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 110/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 336(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा माग काढण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन ट्रॅकिंगच्या माध्यमातून आरोपीचे लोकेशन रोहा परिसरात असल्याचे समोर आले. त्यामुळे रेवदंडा पोलिसांनी रोहा पोलीस स्टेशनची मदत घेतली. अखेर काल ४ सप्टेंबर २०२५ रोजी रोहा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने आरोपीला सापळा रचून ताब्यात घेण्यात रेवदंडा पोलिसांना यश आले.

अटक केलेल्या आरोपीचे नाव सचिन राजू साळुंखे, राहणार खैराळे, पोस्ट कोकबन, ता. रोहा असे असून, त्याला पुढील तपासासाठी रेवदंडा येथे आणण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक म्हशीलकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सुर्वे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनिष ठाकूर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील आणि पोलीस नाईक सिद्धेश शिंदे या पथकाने केला आहे.

या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, बाजारपेठेत सुरू झालेल्या फसवणुकीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

या घटनेवर सर्वप्रथम वृत्त ‘छावा डिजिटल न्यूज पोर्टल’ व sm news Marathi you tube channel ne प्रकाशित केले होते.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *