मोबाईलवर खोटा मेसेज दाखवला आणि स्पीकर घेऊन पोबारा रेवदंड्यात धक्कादायक घटना

रेवदंडा बाजारपेठेत काल २ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २:४५ वाजता एक ग्राहक स्पीकर खरेदीसाठी आला. त्यावेळी त्याला Samcom कंपनीचा ७,५०० रुपये किंमतीचा स्पीकर दाखवण्यात आला. हा स्पीकर राहुल इलेक्ट्रॉनिक्सचे मालक राहुल राजेंद्र जैन यांच्या दुकानातील होता.
रेवदंडा प्रतिनिधी ‘छावा’ ०३ सप्टेंबर २०२५
पैसे देताना ग्राहकाने स्कॅनरवर पैसे जात नाहीत असे सांगितले व “तुमचा मोबाईल नंबर द्या” अशी मागणी केली. त्यानंतर संगीता जैन यांनी त्याला त्यांचा नंबर दिला. लगेचच त्या ग्राहकाने मोबाईलवर पैसे पाठवल्याचा खोटा मेसेज दाखवला आणि तिथून पसार झाला.
प्रत्यक्षात पैसे न भरता मेसेज दाखवून त्याने फसवणूक केली व पलायन केले.
या प्रकारामुळे राहुल इलेक्ट्रॉनिक्सचे मालक राहुल राजेंद्र जैन यांचे ७,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
सध्या बाजारपेठेत अशा प्रकारच्या फसवणुकीचे सत्र सुरू झाल्याचे संकेत मिळत असून, सर्व व्यापाऱ्यांनी आणि ग्राहकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या संदर्भात संगीता राजेंद्र जैन यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.