कोर्लई आत्महत्या प्रकरण फॉरेन्सिक तपासणीसाठी चौकशी सुरू

कोर्लई गावातील नवविवाहित भाग्यश्री समीर बलकवडे आत्महत्या प्रकरणी आज फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची तपासणी केली. या तपासणीदरम्यान विविध नमुने गोळा करण्यात आले असून, त्यांचे अहवाल पुढील चौकशीसाठी निर्णायक ठरणार आहेत.

सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल ३१ ऑगस्ट २०२५

या संदर्भात रेवदंडा पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी भेट देऊन चौकशी केली. मयत भाग्यश्रीच्या मृत्यूबाबत आधीच तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरे व नणंद यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले  यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बाचकर करत आहेत

फॉरेन्सिक म्हणजे काय?

फॉरेन्सिक (Forensic Science) म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने गुन्हा किंवा मृत्यूची चौकशी करणे.

यात घटनास्थळाची तपासणी,

नमुने गोळा करणे (उदा. कपडे, ओढणी, रक्त, केस, बोटांचे ठसे, मोबाइल इ.)

आणि त्यांचा शास्त्रीय अहवाल तयार करणे यांचा समावेश असतो.

फॉरेन्सिक तपासणीतून पोलिसांना हे कळते की मृत्यू नेमका आत्महत्या आहे की संशयास्पद, गुन्ह्यात दुसऱ्यांचा सहभाग आहे का, तसेच घटनास्थळावर नेमकं काय घडलं याचे शास्त्रीय पुरावे मिळतात.

म्हणजेच फॉरेन्सिक तपासणीमुळे प्रकरण कोर्टात सिद्ध करणे सोपे होते आणि सत्य बाहेर येते.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *