पारनाक्या जवळील धोकादायक खड्डे समाजसेवक सुरेंद्र गोंधळी यांनी बुजवले.

‘छावा’ चा परिणाम
“छावा” वर पारनाक्या जवळील रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. परिणामी, समाजसेवक सुरेंद्र गोंधळी यांनी पुढाकार घेत हे खड्डे तातडीने बुजवले.
सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २४ ऑगस्ट २५
गेल्या काही दिवसांपासून या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता. सार्वजनिक बांधकाम खाते मात्र अद्याप झोपेत असताना, सुरेंद्र गोंधळी यांनी स्वतःच्या पुढाकाराने खड्ड्यांमध्ये दगड व विटा भरून तात्पुरत्या स्वरूपात मार्ग सुरक्षित केला.
यामुळे ग्रामस्थ व पर्यटक यांना दिलासा मिळाला आहे. समाजसेवक म्हणून त्यांनी दाखवलेली ही जागरूकता स्तुत्य असल्याचे स्थानिक नागरिक म्हणाले.
प्रशासन कामाला लागत नाही, पण एखादा जागरूक समाजसेवक पुढे आला तर बदल घडू शकतो, हेच यावरून स्पष्ट होते, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटल्या.