१२ वर्षांच्या मुलाचं स्वप्न – रायगडावर भेटलेले छत्रपती

रविवार विशेष
साडेतीनशे वर्षांपूर्वी… राजस्थानातून एक बारीकसा १२ वर्षांचा मुलगा महाराष्ट्रात आला. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न होता
या जगात असा कुणी राजा आहे का, जो प्रजेचं रक्षण करतो, लोकांची सेवा करतो, खरं लोककल्याण करतो?
सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २४ ऑगस्ट २५
त्याला वाटेत एक शेतकरी भेटला. त्या मुलाने विचारलं
अशा राजा कुठे आहे का, जो लोकांसाठी जगतो?
शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी आलं.
हो रे बाळा, तो राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. पण तो स्वर्गात नसून आपल्या रायगडावर असतो. तुला त्याला भेटायचं असेल तर रायगड गाठावं लागेल.
रायगडाच्या पायथ्याशी…
१२ वर्षांचा तो मुलगा खाणं-पिणं विसरून, डोंगर-दऱ्या पार करत रायगडाच्या पायथ्याशी पोहोचला. तेथे त्याला महाराजांचे सेनापती भेटले.
मुलाने विनंती केली – मला महाराजांना भेटायचंय. त्यांचं नाव ऐकलं की अंगावर काटा येतो.
सेनापतींनी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं.
अरे लहानग्या, महाराजांना भेटणं सोपं नाही. जर खरंच त्यांच्यावर प्रेम असेल तर दहा दिवस इथे राहा आणि महाराजांवर गाणी लिही.
मुलगा दहा दिवस तिथेच राहिला. त्याने जिव ओतून कविता लिहिली, गाणी रचली
दरबारातील क्षण – दहा दिवसांनी तो सेनापतीजवळ आला.
त्याने लिहिलेली गाणी ऐकून सेनापती थक्क झाले आणि त्याला छत्रपतींच्या दरबारात घेऊन गेले.
सभागृहात समोर सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज.
मुलगा थरथरत उभा राहिला.
महाराजांनी विचारलं
बाळा, एवढ्या दूरून आलास? काय आणलंयस माझ्यासाठी?
तो म्हणाला, महाराज, मी तुमच्यावर गाणं लिहिलंय…
मुलाचं गाणं – सभागृहात शांतता पसरली आणि तो लहान मुलगा गाऊ लागला
इंद्र जिमी जंभ पर, रघुकुल राज असे,
तैसा शिवराज हा, महाराष्ट्र देशी.
दानव दलन करी, सुरवर जन रक्षणी,
धर्मरक्षणी उभा, स्वराज्य स्थापनी.
जय जय शिवराया, जय जय राजाधिराज,
तुझ्या नावाने हलतो अंगण,
तुझ्या कृपेवर वाचतो समाज!
गाणं संपल्यावर संपूर्ण दरबार दुमदुमून गेला.सैनिक, सरदार, प्रजेच्या डोळ्यांत अश्रू होते.स्वतः महाराजांच्या डोळ्यांत पाणी आलं.
ते म्हणाले बाळा, आज तू फक्त माझं नाही, तर या संपूर्ण स्वराज्याचं हृदय जिंकलंस.
कविराज भूषण यांचं स्तवन
ही परंपरा तिथेच थांबली नाही.छत्रपतींच्या पराक्रमाची कीर्ती दूरवर पसरली आणि उत्तर भारतातील कवी कविराज भूषण यांनी छत्रपतींवर ब्रजभाषेत स्तुतीकाव्य लिहिलं.आजही लोक इंद्र जिमि जृंभपर…म्हणून गातात.
इंद्र जिमि जृंभ पर ! बाडव सुअंभ पर!
रावण सदंभ पर ! रघुकुल राज है !!
पौंन वारिबाह पर ! संभु रतिनाह पर !!
ज्यो सहसवाह पर ! राम द्विजराज है !!
दावा दृमदंड पर ! चिता मृगझुंड पर !!
भूषण वितुंड पर ! जैसे मृगराज है !!
तेज तम अंस पर ! कन्ह जिमि कंस पर !!
त्यों म्लेच्छ वंस पर ! शेर शिवराज है !!
शेर शिवराज है ! शेर शिवराज है !!
शेर शिवराज है ! शेर शिवराज है !!
हे गाणं, ही स्तुती आजही पिढ्यानपिढ्या प्रेरणा देते.
कारण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण भारतवर्षाचे प्रेरणास्थान आहेत.
त्यांचं नाव घेतलं की अंगावर शहारे येतात, हृदय धडधडू लागतं, आणि छातीत ज्वाला पेटते.