शिवरायांची रणश्री – भाग २ : बालपणातील स्वराज्याची बीजं

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक.

हा लेख विविध ऐतिहासिक स्रोत आणि उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आला आहे.

कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही.


शिवनेरीच्या कडेकपारींवर उभं राहून लहानग्या शिवबाने बालपणीच पाहिलं होतं  गावांची दुर्दशा, शेतकऱ्यांची हतबलता आणि जनतेवर होणारे अत्याचार.

सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल

२० ऑगस्ट २५

जिजाऊंच्या कुशीत ऐकलेल्या रामायण-महाभारताच्या कथा त्याच्या डोळ्यांतून स्वराज्याचे चित्र उभं करत होत्या.

आईने सांगितलं  रामराज्य म्हणजे न्याय, धर्म आणि स्वाभिमानाचं राज्य.

लहानशा वयात शिवबाच्या मनात ही बीजं रुजली होती आपल्यालाही असं स्वराज्य उभारायचं आहे.

दादोजी कोंडदेवांनी दिलेली शिस्त त्याला लहानपणीच रणांगणासाठी सिद्ध करत होती.

घोडेस्वारी म्हणजे त्याच्यासाठी खेळ, तर तलवारबाजी म्हणजे श्वास.

गडाच्या अंगणात तो कधी तलवारीची चाचणी करत असे, कधी मावळ्यांना एकत्र करून त्यांना स्वराज्याच्या शपथा घ्यायला लावत असे.

त्याच्या खेळातही फक्त राजा–मंत्री नव्हते, तर गडकोट बांधणं, प्रजेचं रक्षण करणं, शत्रूंवर हल्ला करणं  हेच त्याचे खेळ होते.

शिवबाच्या डोळ्यांतून दिसणारा तो वेगळा तेज ओळखून जिजाऊ नेहमी म्हणत,

हा मुलगा केवळ माझाच नाही, हा या भूमीचाही आहे. याच्याच हातून स्वराज्याचं स्वप्न पूर्ण होईल.

शिवबाच्या लहान वयातच त्याच्या विचारांचा गजर लोकांमध्ये पसरू लागला.

तो जेव्हा म्हणे आपण का गुलाम राहायचं? आपल्याला आपलं राज्य उभारायचं आहे. तेव्हा शेतकरी, मावळे, कोळी यांच्याही डोळ्यांत आशेची ठिणगी पेटत असे.

त्या काळात लोकांना वाटायला लागलं

होय! आपल्या हक्काचं, आपल्या रक्तानं सिंचन केलेलं स्वराज्य आपण पाहू शकतो.

लहानग्या वयातच शिवबाच्या डोळ्यांतून उगवलेलं स्वराज्याचं स्वप्न, हेच पुढे रायगडावरच्या सिंहासनात रूपांतर होणार होतं.

बालपण म्हणजे फक्त खेळणं नव्हे, तर इतिहासात स्वराज्याचं बीज पेरण्याचा तो काळ ठरला.

 

 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *