गातो नेहमी… दिसतो क्वचित! पावसात समोर आला सोनेरी कोकीळ

रेवदंडा | १८ ऑगस्ट २०२५

छावा – रेवदंडा – सचिन मयेकर 

पावसाच्या सरींमध्ये आज रेवदंड्यातील शाळेच्या आवारात एक आगळावेगळा प्रसंग घडला. नेहमी केवळ गोड आवाजाने आपली उपस्थिती जाणवून देणारा कोकीळ पक्षी प्रत्यक्ष डोळ्यांसमोर दिसला. विशेष म्हणजे, दर्शन झाले ते सोनेरी कोकीळाचे. अंगावर तपकिरी-राखाडी ठिपके, पांढुरक्या रेषा आणि सोनेरी छटा असलेला हा पक्षी निसर्गाला वेगळीच शोभा देत होता.

कोकीळाबद्दल सर्वांना परिचित गोष्ट म्हणजे त्याचा मोहक स्वर. पावसाळ्यात हा आवाज सतत कानावर येत राहतो. मात्र प्रत्यक्ष दर्शन क्वचितच घडते. नर कोकीळ पूर्ण काळाकुट्ट दिसतो, तर मादी कोकीळ अंगावर सोनेरी-तपकिरी छटा असलेली असल्याने अधिक आकर्षक दिसते. यामुळेच आजचे दर्शन हे अविस्मरणीय ठरले.

पावसाळा म्हणजे थेंबांचे संगीत, हिरवाई आणि पक्ष्यांचा गोड किलबिलाट. या साऱ्यात कोकीळाचा स्वर एक अनोखी मोहिनी निर्माण करतो. गोड गाणं आणि सोनेरी झळाळी यांचा संगम अनुभवताना आजचा क्षण खऱ्या अर्थाने निसर्गाची अनमोल भेट ठरला.

 

 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *