अलिबाग तालुक्यातील रस्त्यांची दैनावस्था – जनता त्रस्त

१८ ऑगस्ट २०२५

सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल

पोयनाड, पेझारी, बेलकडे–पाल्हे बायपास, कुरूळचें जवळील रस्ता, चौल नाक्यावरील रस्ता आणि नागाव–रेवदंडा मार्गावर तसेच तालुक्यात ठिकठिकाणी खड्ड्यांचा कहर!

बेलकडे–पाल्हे बायपास, कुरूळचें जवळील रस्ता, चौल नाक्यावरील रस्ता आणि नागाव–रेवदंडा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य  जनता संतप्त: “अपना काम बनता, भाड में जाये जनता अशा कडक प्रतिक्रिया जनतेने दिल्या आहेत.

अलिबाग तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे.

सर्व मार्ग अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य बनले आहेत.

पावसाळ्याच्या तडाख्यात या रस्त्यांवर पाणी साचलेलं, खड्ड्यांनी उघडं पडलेलं, आणि वाहनचालकांना रोज मृत्यूशी सामना करावा लागतो आहे. दुचाकीस्वारांना तर जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत असून, अपघातांची मालिका सुरूच आहे.

कुरूळचें जवळील रस्त्यावर इतके खोल खड्डे आहेत की, त्यात वाहन पडलं तर थेट मृत्यू ठरावा अशी परिस्थिती आहे. चौल नाक्याजवळील मार्ग तर लोकांनी थेट मृत्यूचा ट्रॅप असं नाव दिलं आहे. बेलकडे–पाल्हे बायपासवर गाड्या खड्ड्यांत पडून अक्षरशः ‘तुमचं वाहन की खड्डा?’ असं कोडं नागरिकांपुढे उभं राहिलं आहे.

या सर्व परिस्थितीवर जनतेचा संताप उफाळून आला आहे.

आम्ही कर भरतो, प्रवास करतो… तरी खड्ड्यांतच मरायचं? जनता त्रासते, अपघातात सापडते, आणि वर ‘अपना काम बनता, भाड में जाये जनता’ असा कारभार चाललाय का? असा जळजळीत सवाल नागरिक करत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून हे सर्व मार्ग खड्डेमुक्त करावेत. अन्यथा एखाद्या मोठ्या दुर्घटनेची जबाबदारी थेट प्रशासनावर असेल, अशी ठाम मागणी लोकांनी केली आहे.

अलिबाग – पोयनाड रस्ता : खड्ड्यांचा महासागर.

अलिबाग ते पोयनाड या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे अक्षरशः साहसाचा खेळ झाला आहे.

रस्त्यावर खड्डे आहेत असं नाही, तर खड्ड्यात खड्डे झालेत – एवढी भीषण अवस्था आहे.

खड्ड्यांची ठिकाणं

पिंपळभाट, वेश्वी, कार्लेखिंड आणि तीनविरा येथे तर खड्ड्यांचं साम्राज्यच दिसतं.

पोयनाडकडे धरमतर ब्रिजच्या अलीकडे – पेट्रोल पंप ते फौजी ढाबा हा भाग तर जणू चंद्राच्या खड्ड्यांनी भरलेला प्रदेश वाटतो.

प्रवाशांची रोजची धावपळ

वाहनचालकांना प्रत्येक काही पावलांवर ब्रेक लावावा लागतो. दोन चाकी असो वा चार चाकी, प्रत्येक वाहन खड्ड्यात अडकतंय. अपघाताचा धोका कायम डोक्यावर आणि जीव मुठीत धरून लोकांना प्रवास करावा लागत आहे.

एवढ्या महत्त्वाच्या मार्गाची अशी दुर्दशा का?

प्रशासनाला या खड्ड्यांकडे पाहायलाही वेळ आहे का?

लोकांचा एकच आक्रोश आणि अपना काम बनता भाड मे जाये जनता? अशा कारभाराविरुद्ध जनता संताप व्यक्त करत आहेत.

“रस्ता नाही… खड्ड्यातून प्रवास.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *