Jessica Dolphin Viral Video – खोट्या दाव्याचा पर्दाफाश.

दिनांक : १७ ऑगस्ट २०२५


सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल


सोशल मीडियावर सध्या धडाक्यात एक धक्कादायक व्हिडिओ फिरताना दिसतो आहे. Jessica डॉल्फिन किंवा Jessica रडचलीफ्फे नावाच्या मुलीला डॉल्फिनने किंवा ऑरकाने (killer whale) जिवंत खाल्लं! असा दावा त्यासोबत केला जातो आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे मन सुन्न झाले, तर काहींनी भीतीपोटी तो लगेच पुढे पाठवला.

पण छावा वाचकांनो — खरी गोष्ट अशी आहे की, हा व्हिडिओ संपूर्ण खोटा आणि बनावट आहे!

तपासणीत स्पष्ट झालं आहे की या व्हिडिओतील दृश्य AI तंत्रज्ञानाने बनवलेले आहेत. आवाज, हालचाल आणि पार्श्वभूमी पूर्णपणे कृत्रिम आहे.

Jessica Radcliffe नावाची कुठलीही ट्रेनर अस्तित्वात नाही.

Pacific Blue Marine Park नावाचा कोणताही समुद्री पार्क जगात नाही.

या घटनेची पुष्टी करणारी एकही अधिकृत बातमी, पोलिस नोंद किंवा वृत्तसंस्था नाही.

NDTV, Times of India, Economic Times, Hindustan Times यांसारख्या विश्वासार्ह माध्यमांनी या व्हिडिओला “hoax” (खोटी घटना) ठरवले आहे. म्हणजेच, लोकांच्या भावना भडकावण्यासाठी आणि व्हायरलसाठी हा व्हिडिओ मुद्दाम तयार करण्यात आला आहे.

आजकालच्या AI-जनरेटेड व्हिडिओंमुळे (Deepfake) खऱ्या-खोट्याची सीमा पुसली जाते. जेव्हा एखादं दृश्य इतकं वास्तवदर्शी दिसतं, तेव्हा लगेच लोकांचा विश्वास बसतो. पण त्यामागचं तंत्रज्ञान सामान्य माणसांच्या नजरेला धूळफेक करतं.

         छावा कडून इशारा!

हा व्हिडिओ पूर्ण खोटा आहे.

 कुणालाही डॉल्फिनने गिळलं नाही.

 सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक दृश्यावर विश्वास ठेवू नका.

 अशा बनावट क्लिप्सच्या मागे केवळ व्ह्यूज, लाईक्स आणि भीती निर्माण करण्याचा हेतू असतो.

छावा वाचकांनो, तुम्ही अशा अफवांना बळी पडू नका. खऱ्या आणि विश्वासार्ह बातम्या फक्त प्रमाणित स्रोतांवरूनच घ्या.          वाचकांना, शाळांमध्ये किंवा घरात मुलांना ही गोष्ट नक्की समजवा प्रत्येक व्हिडिओवर विश्वास ठेवायचा नसतो.

 सचिन मयेकर, छावा – रेवदंडा

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *