रेवदंडा आगरकोट किल्ल्यात पुण्याच्या महिलेवर बुरुज कोसळला – गंभीर जखमी

दिनांक : १७ ऑगस्ट २०२५


सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-रेवदंडा


नागाव येथे गोविंदाच्या सुट्टीनिमित्त फिरण्यासाठी आलेले पुणे येथील एक विवाहित जोडपे रेवदंडा येथील प्रसिद्ध आगरकोट किल्ला आणि सातखणी बुरुज पाहण्यासाठी रविवारी गेले. त्यांच्याकडे स्वतःची कार असूनही त्यांनी नागाववरून रिक्षाने रेवदंड्याला जाण्याचा निर्णय घेतला.

किल्ल्याची सफर करत असताना ते सातखणी बुरुजाजवळ पोहोचले आणि दुर्दैवी घटना घडली. फिरून झाल्यावर बुरुजाजवळ ठेवलेली स्वतःची बॅग पर्स आणण्यासाठी गेली असता बुरुजाचा सिमेंटचा काही भाग अचानक कोसळून पुणे येथील सौ. अबोली श्रीकांत देशपांडे (वय ५३) यांच्या डोक्यावर पडला.

या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून तात्काळ स्थानिकांनी त्यांना रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. मात्र जखम गंभीर असल्याने त्यांना पुढे अलिबाग येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

पुरातत्व विभागाकडे मोठे आव्हान

या अपघातामुळे ऐतिहासिक वारशाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आगरकोट किल्ला व सातखणी बुरुज आता जीर्णावस्थेला पोहोचले असून पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.

तज्ञांच्या मते, पुरातत्व विभागाने तातडीने डागडुजी (structural audit) करून बुरुजांची दुरुस्ती व संरक्षणकार्य सुरू करणे अत्यावश्यक आहे. तसेच धोकादायक ठिकाणी इशारा फलक (Danger Boards) लावणे सक्तीचे असावे, जेणेकरून अशा घटना रोखता येतील पर्यटक त्यापासून दूर राहतील.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *