आगरकोट किल्ला येथे ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न

रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक आगरकोट किल्ला येथे आज ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे ध्वजारोहण रेवदंडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्ल यशवंत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले हे आपल्या स्टाफसह उपस्थित होते. झेंड्याला सलामी देत मानवंदना अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्र कुमार सदाशिव वाडकर, खलील तांडेल, सुराराम माळी, दुषांत झावरे तसेच ग्रामस्थ सौं. भारती प्रफुल्ल मोरे,संदीप खोत, हेमा गणपत, विश्वनाथ घरत, सदाशिव मोरे, हर्षल घरत, राजेश चुनेकर, प्रसाद गोंधळी, तेजस शिंदे, सुभाष शेळके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच पोलीस पाटील स्वप्निल तांबडकर आणि इतर मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवली.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *