धक्कादायक! रामराज-आंबेवाडी येथे 4 वर्षीय चिमुकल्यावर अमानुष लैंगिक अत्याचार

दिनांक : १३ ऑगस्ट २०२५
छावा – सचिन मयेकर, रेवदंडा
रामराज-आंबेवाडी या आदिवासी वाडीत एका अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेनं गाव हादरलं आहे. फिर्यादी यांचा केवळ 4 वर्षे 2 महिन्यांचा निष्पाप मुलगा गावातील बुरूमखाण परिसरात एकटाच खेळत असताना, शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन आरोपीने त्याला जाळकाटीच्या झुडपात नेऊन अमानुष पद्धतीने लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
या घृणास्पद कृत्यानंतर पीडित चिमुकल्याच्या गुदद्वाराजवळ गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव झाला. घटनेनंतर धक्क्यात गेलेल्या पालकांनी तात्काळ रेवदंडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी 102/2025 क्रमांकाचा गुन्हा बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत कलम 4(2), 5(m), 6(1) नुसार दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई श्रीराम पडवळ करीत आहेत.