रेवदंडा : मारुती आळी येथे गावकीच्या सप्ताहास प्रारंभ

दिनांक : ७ ऑगस्ट २०२५
छावा प्रतिनिधी – रेवदंडा
रेवदंडा गावातील मारुती आळी मधील श्री मारुती मंदिरात दि. ०६ ऑगस्ट २०२५ पासून गावकीच्या सप्ताहास उत्साही प्रारंभ झाला आहे. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी दिसून आली. मंगल वाद्यांच्या गजरात श्री मारुतीरायाची भव्य पूजा करण्यात आली आणि नंतर सप्ताहाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.