मनोरंजन | अॅनिमेप्रेमींना खूश करणारी बातमी! 🎬 Demon Slayer: Infinity Castle भारतात लवकर!

पायरेटिंगच्या भीतीमुळे प्रदर्शन ऑगस्टमध्येच होणार
छावा – मुंबई | सचिन मयेकर
Demon Slayer अॅनिमे मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे! जपानमध्ये प्रचंड यश मिळवलेला अॅनिमे चित्रपट “Demon Slayer: Infinity Castle – Part 1: Akaza’s Return” आता भारतात सप्टेंबर १२ ऐवजी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीसच प्रदर्शित होणार आहे.
Cinépolis India ने ही माहिती दिली असून लवकरच तिकीट बुकिंग सुरू होणार आहे. पायरेटिंगच्या वाढत्या धोरणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे भारतातील रिलीज आता आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाच्या जवळ असेल.
या चित्रपटाचा जपानमध्ये झालेला प्रीमियर खचाखच भरलेल्या थिएटरमध्ये झाला आणि विक्रमी ओपनिंग मिळवली. Demon Slayer या मालिकेतील हा टप्पा “Infinity Castle Arc” या नावाने ओळखला जातो आणि चाहत्यांच्या अत्यंत अपेक्षा असलेल्या भागांपैकी एक आहे.