‘शुद्ध शाडूपासून श्रद्धेचा आकार’ – हरेश्वर मंदिर परिसरातील ‘पूजा आर्ट’चा ३२ वर्षांचा नंदकुमार चुनेकर यांचा आत्मसिद्ध प्रवास!

छावा- रेवदंडा – सचिन मयेकर
दिनांक: ०२ ऑगस्ट २०२५ | रेवदंडा
थोड्याच दिवसांत गणेशोत्सव साजरा होणार आहे. रेवदंडा गावात वातावरण भक्तिमय झालं असून, हरेश्वर मंदिर परिसरातील ‘पूजा आर्ट’ या मूर्ती कारखान्यात सध्या मूर्तींच्या रंगकामाला वेग आला आहे. या कारखान्याचे संस्थापक व मूर्तिकार नंदकुमार काशिनाथ चुनेकर हे गेले ३२ वर्षांपासून निसरगस्नेही शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारत आहेत.
स्वकर्तृत्वातून उभारलेलं ‘पूजा आर्ट’ – एक श्रद्धेचा प्रवास
नंदकुमार चुनेकर यांचा हा व्यवसाय घराणेशाही परंपरेतून आलेला नाही, तर स्वत:च्या आवडी, जिद्द आणि मेहनतीतून उभा राहिलेला आहे. “गणपती बनवणे हे माझं स्वप्न होतं, आणि गेली ३२ वर्षे मी ते जगतोय — आणि तेही फक्त शाडू मातीचा वापर करून!” असं ते अभिमानाने सांगतात. त्यामुळेच ‘पूजा आर्ट’ हे नाव रोजगारापेक्षा श्रद्धेच्या सेवा-भावनेशी अधिक जोडलेलं आहे.
शाडू माती आणि रंगांच्या दरवाढीचा परिणाम – तरीही भक्तीला किंमत नाही
या वर्षी शाडू माती, कागदाचा लगदा, रंग यांचे दर लक्षणीय वाढले आहेत. परिणामी, मूर्तींच्या किंमतीत काही प्रमाणात वाढ होणार आहे. मात्र, “श्रद्धेला मोजमाप नसतं. आम्ही भाविकांना शक्य तेवढ्या माफक दरात मूर्ती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो,” असं श्री. चुनेकर यांनी स्पष्ट केलं.
मूर्ती तयार – रंगकाम अंतिम टप्प्यात
सध्या मूर्तींचं बनवण्याचं काम पूर्ण झालं असून, त्या रंगवण्याच्या अंतिम टप्प्यावर आहेत. दिवसरात्र मेहनत करून त्या भक्तांच्या घरात विराजमान होण्यास सज्ज होत आहेत.
पूजा आर्ट – रेवदंड्यातील श्रद्धेचं आणि पर्यावरणस्नेही गणेशमूर्तींचं केंद्र
पूजा आर्ट म्हणजे केवळ एक कारखाना नाही, तर तो आहे एक शुद्ध शाडूपासून श्रद्धेला दिलेला आकार. नंदकुमार चुनेकर यांनी हा व्यवसाय उभा करताना रेवदंड्यातील लोकांचा विश्वास, निसर्गप्रेम आणि भक्तिभाव यांचा आदर जपला आहे.
पूजा आर्ट – शुद्ध शाडूमधून श्रद्धेला आकार देणारा एक आत्मसिद्ध प्रवास