न्हावा-शेवा बंदरातून विदेशी सिगारेटची मोठी तस्करी उधळली

छावा, मुंबई | दि. २१ जुलै (सचिन मयेकर)

DRI ची कारवाई, १३.१८ कोटींचा माल जप्त

देशात बेकायदेशीर मार्गाने परदेशी सिगारेट पुरवण्याचा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) दक्ष कारवाईने उधळण्यात आला आहे. जेएनपीटी (न्हावा-शेवा) बंदरावर छापा टाकून तब्बल १३ कोटी १८ लाख रुपयांचा सिगारेट साठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एकाला अटक झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, डीआरआयच्या मुंबई युनिटला मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई राबवण्यात आली. संशयित कंटेनरमध्ये ‘कोटेड कॅल्शियम कार्बोनेट’ असा खोटा माल दर्शवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या कंटेनरमध्ये परदेशी बनावटीचे तब्बल १,०१,४०,००० सिगारेट लपवण्यात आले होते.

या सिगारेटपैकी कोणत्याही पाकिटावर भारतीय कायद्याप्रमाणे आवश्यक असलेले आरोग्य इशारे नव्हते, त्यामुळे त्या पूर्णतः बेकायदेशीर ठरतात. याप्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात १९६२ चा सीमा शुल्क कायदा व २००८ चा सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीस न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू केला आहे.

१३.१८ कोटी रुपयांचा सिगारेट साठा जप्त

सुमारे १ कोटी सिगारेट देशात चोरट्या मार्गे आणण्याचा प्रयत्न

सिगारेटवर कोणतेही वैधानिक आरोग्यसूचक इशारे नव्हते

एका आरोपीला अटक; १४ दिवसांची कोठडी

डीआरआयकडून तपास सुरू

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *